रत्नागिरी-संगमेश्वरातील तीन मंदिरे चोरट्यांनी फोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संगमेश्वरातील तीन मंदिरे चोरट्यांनी फोडली
रत्नागिरी-संगमेश्वरातील तीन मंदिरे चोरट्यांनी फोडली

रत्नागिरी-संगमेश्वरातील तीन मंदिरे चोरट्यांनी फोडली

sakal_logo
By

संगमेश्वरातील तीन मंदिरे
चोरट्यांनी फोडली
साडेसात लाखाच्या चोरीचा २४ तासात छडा
रत्नागिरी, ता. २८ ः जिल्ह्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री तीन मंदिरे व एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ऐवज लांबवला. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सगंमेश्वर पोलिसांची चोरट्यानी झोप उडवली. मात्र पोलिसांनीही चोरट्यांचा पुरता पिच्छा पुरवत साडे सात लाखाच्या चोरीचा २४ तासात छडा लावला. या कामगिरीबद्धल पोलिसांचे कौतुक होत आहे. घरातच ही रक्कम मिळाल्याने ती व्यक्ती कोण याचा तपास पोलिस करत आहे.
ऐन दिवाळीत जिल्ह्यात चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दानपेट्या फोडून नावडी परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. संगमेश्वर तालुक्यातील श्री वरदायिनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून गाभाऱ्यात देवीसमोरील स्टीलची दानपेटी फोडून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यानी सरंद गुरववाडीतील वाघजाई मंदिराकडे मोर्चा वळवला व वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडून चोरटे माखजन धामापूर गुरववाडीतील श्री नवसरी ग्रामदेवीच्या मंदिरात पोहचले आणि त्या ठिकाणी देखील गाभाऱ्यातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली.
संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारून चोरट्यांची पावले नावडी परिसराकडे वळली. नावडी येथील वैशाली संजय रहाटे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. एकाचवेळी ४ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने संगमेश्वर पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले.
सौ. वैशाली संजय रहाटे (वय ४४, रा. नावडी बाजारपेठ) यांनी संगमेश्वर पोलिसात राहत्या घरातील कपाटातील सोन्याचे सुमारे साडेसात लाखाचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली होती. राहत्या घरात झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. पोलिस उपनिरीक्षक देशमुख, सचिन कामेरकर, किशोर जोयशी, आव्हाड, कांबळे, बरगाळे, शिंदे, पंदेरे यांनी तपास करीत २४ तासात ही चोरी उघडकीस आणली. पोलिसांनी मोबाईल कंपनीचा सीडीआरवरून कोणाच्या संपर्कात आहे याची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांना एक धागा मिळाला. त्यावरून पोलिसांनी घरातच तपासणी केली असता हा ऐवज सापडला. यामागे कोण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्धल कौतुक होत आहे.