खेड-विवाहितेचे मंगळसूत्र लांबवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-विवाहितेचे मंगळसूत्र लांबवले
खेड-विवाहितेचे मंगळसूत्र लांबवले

खेड-विवाहितेचे मंगळसूत्र लांबवले

sakal_logo
By

रल्वेस्टेशनवर महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
खेडः कोकण रेल्वे मार्गावरील दिवा-सावंतवाडी पॅसेंजरमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने विवाहितेच्या खांद्याला लावलेली पर्स चोरली. त्यातील सुमारे ९० हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना २६ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास खेड रेल्वेस्थानकात घडली. अमृता अमित कांगणे (वय २४, रा. वागळे इस्टेट, ठाणे, मुळ गाव- तळे कांगणेवाडी, खेड) यांनी येथील पोलिसात तक्रार दिली. ही विवाहिता २६ ला ठाणे येथे जाण्यासाठी येथील पोलिसात आलेल्या दिवा पॅसेंजर या गाडीत शिरत असताना गर्दीचा फायदा उचलून चोरट्याने कांगणे यांच्या खांद्याला लावलेली पर्स चोरून नेत त्यामध्ये असलेल्या ९० हजाराचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी चोरट्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.