घाटरस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटरस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा
घाटरस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा

घाटरस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा

sakal_logo
By

59023
कणकवली ः सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना निवेदन देताना व्यापारी महासंघाचे पदाधिकारी.


घाटरस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा

व्यापारी महासंघाची मागणी; फोंडाघाट, करूळप्रश्नी ‘बांधकाम’ला निवेदन

कणकवली, ता.२८ : वैभववाडी-करूळ आणि देवगड निपाणी मार्गावरील फोंडाघाटमार्गाची तातडीने दुरूस्ती करा अशी मागणी आज जिल्‍हा व्यापारी महासंघाने केली. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना दिले. यावेळी श्री.सर्वगोड यांनी घाटरस्त्यांच्या दुरूस्तीची कामे प्राधान्याने सुरू केली जातील, अशी ग्‍वाही दिली.
जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा कार्यवाह नंदन वेगुर्लेकर यांच्या नेतृत्‍वाखालील व्यापारी प्रतिनिधींनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची भेट घेतली. यावेळी महासंघ कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांच्यासह राजू पावसकर, महेश नार्वेकर, निवृत्ती धडाम, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष गुरुप्रसाद वायंगणकर, उपाध्यक्ष मारुती मोरये, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, भाई मोरजकर, कमलेश पाटील, फोंडाघाट अध्यक्ष यशवंत मसुरकर, नागेश कोरगांवकर, सिद्धेश पावसकर, गुणेश कोरगांवकर, संदीप पारकर, रंजन चिके, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, घाट रस्ते आणि लगतच्या बाजारपेठांमधील रस्त्यावर पावसाचे पाणी येत आहे. नांदगाव ते दाजीपूर खिंड तसेच असलदे रोड ते असलदे पिरापर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. करूळ घाटमार्गाचीही अवस्था बिकट आहे. प्रत्येक वर्षी या मार्गावर रस्त्याच्या खड्ड्यामुळे मनुष्य बळी घेतले जात आहेत; परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत गंभीर नाही. अजून किती लोकांचे बळी घेणार?अशी विचारणा असलदे सरपंच पंढरी वायगणकर यांनी केली.
---
पर्यटन व्यवसायावर परिणाम
फोंडाघाट मार्गात आठ दिवसापूर्वी एका दुचाकीस्वाराचा खड्डे चुकविताना अपघात होऊन मृत्‍यू झाला होता. तर पर्यटक आणि व्यापारासाठी येणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे सिंधुदुर्गात घाटमाथ्यावरील पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्‍याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. त्‍यामुळे घाट रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली.
--
कोट
दोन्ही घाट रस्त्यांच्या निविदा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत. शासनाकडून निधी मंजूर होताच तातडीने डांबरीकरणाची कामे सुरू होतील.
घाट रस्ता डागडुजीची कामे तातडीने सुरू केली जातील.
- अजयकुमार सर्वगोड, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग