पान एक-मोटार अपघातात पाचजण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-मोटार अपघातात पाचजण जखमी
पान एक-मोटार अपघातात पाचजण जखमी

पान एक-मोटार अपघातात पाचजण जखमी

sakal_logo
By

५९०२५

पान एक

टीपः swt२८४०.jpg मध्ये फोटो आहे.

मोटार अपघातात पाच जण जखमी
मळगावातील घटना ः जखमींत कोल्हापूरच्या पर्यटकांसह पशुवैद्यकाचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून मोटार दुभाजक तोडून थेट विरुद्ध लेनवर जात दुसऱ्या एका मोटारीला धडकली. धडकेत दोडामार्ग-मोरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी बंडू जिवाजी सोनटक्के हे जखमी झाले. ही घटना आज दुपारी १ च्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव येथे घडली. या अपघातात पर्यटकांच्या मोटारीतील ५ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर येथील पर्यटक मोटारीतून गोव्याच्या दिशेने जात होते तर पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के मोटारीतून ओरोसला जात होते. यावेळी भरधाव जाताना पर्यटकांच्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून ती थेट डिव्हायडर तोडत विरुद्ध लेनवर आली व सोनटक्के यांच्या मोटारीला जोरदार धडक बसली. यात ते व पाचही पर्यटक जखमी झाले. यातील दोघांना गंभीर दुखापत झाली तर दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमींना स्थानिकांनी मदतकार्य करत १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. या वेळी रुग्णवाहिका चालक धैर्यशील शिर्के यांनी तात्काळ घटनास्थळी जात रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल केले. या वेळी सावंतवाडीचे माजी सभापती राजू परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी, संजय जोशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.