झोळंबेत आजपासून खुली भजन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोळंबेत आजपासून
खुली भजन स्पर्धा
झोळंबेत आजपासून खुली भजन स्पर्धा

झोळंबेत आजपासून खुली भजन स्पर्धा

sakal_logo
By

झोळंबेत आजपासून
खुली भजन स्पर्धा
बांदा, ता. २८ ः झोळंबे भजनप्रेमी व ग्रामस्थ आयोजित खुली भजन स्पर्धा २९ व ३० ला होत आहेत. उद्या (ता.२९) सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील १४ व गोव्यातील २ नामवंत मंडळे सहभागी झाली आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी श्री देवी माऊली बांदेकर भजन मंडळ आडाळी, सातेरी भजन मंडळ मणेरी, श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळ माटणे, अभंग महिला भजन मंडळ कुडाळ, भवानी प्रासादिक भजन मंडळ न्हावेली, श्रीदेव रवळनाथ भजन मंडळ पाडलोस, भूतनाथ भजन मंडळ निरवडे व स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी यांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. या दिवशी श्री मुसळेश्वर भजन मंडळ मळेवाड, श्रीदेव सावंतवस भजन मंडळ इन्सुली, श्री आजोबा कल्चरल असोशिएशन सत्तरी गोवा, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त, रवळनाथ माऊली समर्थ प्रासादिक भजन मंडळ कास, माऊली भजन मंडळ कोलझर, श्री गोवर्धन भजन मंडळ तुळस व श्री साई सातेरी आजोबा भजन मंडळ केरी गोवा या भजन मंडळाचा समावेश आहे. भजनप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन झोळंबे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.