प्रदीप कालवणकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदीप कालवणकर यांचे निधन
प्रदीप कालवणकर यांचे निधन

प्रदीप कालवणकर यांचे निधन

sakal_logo
By

59033
प्रदीप कालवणकर
सावंतवाडी, ता. २८ ः धवडकी (ता.सावंतवाडी) येथील साईकृपा फोटो स्टुडिओचे मालक, प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप कालवणकर (वय ४७) यांचे निधन झाले. कालवणकर हे फोटोग्राफीच्या माध्यमातून तालुक्यातील धवडकीसह माडखोल, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे आदी गावात सर्वांच्या परिचयाचे होते.
.............
59032
अनुसया माळकर
सावंतवाडी, ता. २८ ः साळगाव-मेस्त्रीवाडी (ता. कुडाळ) येथील अनुसया रघुनाथ माळकर (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माणगाव सर्वोदय सहकारी पतसंस्थेचे निवृत्त कर्जवसुली पथक अधिकारी दिलीप माळकर यांच्या त्या आदी होत.
----------
59031
मधुकर कदम
देवगड ः इळये (ता.देवगड) येथील आंबा बागायतदार आणि जनसंघासह भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर भानजी कदम (वय७५) यांचे निधन झाले. देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे ते माजी संचालक होते. तत्कालीन भाजप आमदार अप्पासाहेब गोगटे यांचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
...................................
59030
वासंती वालावलकर
वेंगुर्ले, ता. २८ ः कॅम्प येथील श्रीमती वासंती गुरुनाथ वालावलकर (वय ८०) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर समर्थक सचिन वालावलकर यांच्या त्या आई होत. लक्ष्मी नारायण महा ई सेवा केंद्र चालक समिक्षा सचिन वालावलकर यांच्या त्या सासू होत.