सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला जिल्ह्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभापती राहुल नार्वेकर 
६ नोव्हेंबरला जिल्ह्यात
सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला जिल्ह्यात

सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला जिल्ह्यात

sakal_logo
By

59064
गोवा ः डिचोली विधानसभा मतदारसंघात भेट दिल्यानंतर सभापती राहुल नार्वेकर.

सभापती राहुल नार्वेकर
६ नोव्हेंबरला जिल्ह्यात
कुडाळ, ता. २९ ः महाराष्ट्र विधानसभेचे सभापती आमदार राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भाजप सोशल मीडिया रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सामान्य जनतेचा विकास विविध योजनांमधून तळागाळात पोहोचला पाहिजे, यादृष्टीने ते मार्गदर्शन करणार आहेत.
सभापती नार्वेकर यांनी नुकतीच गोवा येथे डिचोली विधानसभा मतदारसंघात भेट दिली. यावेळी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डिचोली भाजपचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे मीडिया संयोजक अविनाश पराडकर व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत जिल्ह्यातील सद्यस्थिती व समस्यांबाबत चर्चा केली. तसेच सिंधुदुर्ग भेटीसाठी आमंत्रण दिले. त्यानुसार नार्वेकर यांनी ६ नोव्हेंबरला सावंतवाडी व कुडाळ तालुक्यांना भेट देण्याचे मान्य केले आहे. नार्वेकर हे सावंतवाडी पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांची महाराष्ट्र विधानसभा सभापतीपदी झालेली निवड सिंधुदुर्गवासीयांसाठी आनंदाची व अभिमानस्पद घटना असून यानिमित्ताने त्यांचा या भेटीदरम्यान सिंधुदुर्गवासीयांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती पराडकर यांनी दिली.