मालवण पालखी सोहळ्यास भाजप नेते परब यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण पालखी सोहळ्यास 
भाजप नेते परब यांची भेट
मालवण पालखी सोहळ्यास भाजप नेते परब यांची भेट

मालवण पालखी सोहळ्यास भाजप नेते परब यांची भेट

sakal_logo
By

59068
मालवण ः श्री देव रामेश्वर पालखीचे दर्शन घेताना भाजपचे युवा नेते विशाल परब.


मालवण पालखी सोहळ्यास
भाजप नेते परब यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांच्या पालखी सोहळ्यामुळे मालवण बाजारपेठ भक्तिमय झाली होती. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी श्री देव रामेश्वर पालखीचे दर्शन घेत आपले प्रेरणास्थान भाजप नेते नीलेश राणे हे आमदार म्हणून निवडून येऊ देत, असे साकडे त्यांनी रामेश्वराला घातले.
या पालखी सोहळ्याने बाजारपेठ गजबजून गेली होती. दिवाळी पाडवा व भाऊबीज या द्विगुणित आनंदात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला. भाविकांसह सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेत रामेश्वराला साकडे घातले. मालवण शहरात दरवर्षी साजरा होणाऱ्या श्री देव रामेश्वर पालखी सोहळ्यास यावर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला. भाविक मोठ्या संख्येने मालवणात दाखल झाले होते. भाजपचे युवा नेते विशाल परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेत मालवणवासीयांच्या उत्तम आरोग्याची, शेतकरी, व्यापारी व मच्छीमारांच्या व्यवसायात वृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी दादा साईल, आनंद परब आदी उपस्थित होते. या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने मालवणवासीय उपस्थित होते.