धामणसेत आनंदाचा शिधाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणसेत आनंदाचा शिधाचे वाटप
धामणसेत आनंदाचा शिधाचे वाटप

धामणसेत आनंदाचा शिधाचे वाटप

sakal_logo
By

rat२९p१.jpg
५९०५१
रत्नागिरीः तालुक्यातील धामणसे येथे आनंदाचा शिधा वाटपामध्ये धामणसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने पुढाकार घेऊन त्याचे वाटप केले.
------------
धामणसेत आनंदाचा शिधाचे वाटप
रत्नागिरी, ता. २९ः तालुक्यातील धामणसे येथे दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधाच्या माध्यमातून चार जीवनावश्यक वस्तूंचे राज्यात सर्वत्र वितरण करण्यात येत आहे. तालुक्यातील धामणसे गावात धामणसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेड धामणसे यांच्यातर्फे आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.
या वेळी सोसायटीचे चेअरमन श्रीकांत देसाई, सरपंच विलास पांचाळ, धान्य वाटप कमिटीचे अध्यक्ष दीपक जाधव, सोसायटीचे संचालक व भाजपा तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, दिलीप तांबे, सचिव सुनील लोगडे, मापारी पाल्ये, पांचाळ उपस्थित होते. या वेळी सोसायटीचे चेअरमन श्रीकांत देसाई म्हणाले, चांगल्या प्रतीचा १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल हे अवघ्या १०० रुपयांमध्ये या चार वस्तूंचे वाटप सुरळीतपणे सुरू आहे. गावातील सर्व लाभधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांची दिवाळी आनंदमय जाणार आहे. या वेळी भाजपा तालुका सरचिटणीस उमेश कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागातही सर्वसामान्यांपर्यंत व्यवस्थित आनंदाचा शिधा वाटप होत आहे. गावातील ४२५ कार्डधारकांना लाभ मिळणार आहे.