बांधकाम परवानाबाबत लवकरच निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम परवानाबाबत लवकरच निर्णय
बांधकाम परवानाबाबत लवकरच निर्णय

बांधकाम परवानाबाबत लवकरच निर्णय

sakal_logo
By

59093
हरकुळ खुर्द : येथील उपोषणकर्ते अशोक घाडी यांना लेखी आश्‍वासन देताना ग्रामविकास अधिकारी गणेश परब.


बांधकाम परवानाबाबत लवकरच निर्णय

ग्रामविकास अधिकारी ः हरकुळ खुर्दच्या घाडींचे उपोषण स्थगित

कणकवली, ता.२९ : घर बांधकाम परवानगीबाबत तीस दिवसांत निर्णय घेण्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीतर्फे देण्याची ग्वाही ग्रामविकास अधिकारी गणेश परब यांनी देताच हरकुळ खुर्द (ता.कणकवली) येथील ग्रामस्थ अशोक घाडी यांनी उपोषण स्थगित केले. घाडी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बेमुदत उपोषण सुरू केले होते. हरकुळ खुर्द येथील त्‍यांच्या सामाईक जमिनीमध्ये घर बांधकामासाठी परवानगी मिळत नसल्‍याने त्‍यांनी उपोषण छेडले होते. याप्रश्‍नी सरपंच विदिशा तेली आणि श्री. परब यांनी चर्चा करून या मुद्यावर तीस दिवसांत निर्णय घेण्याचे स्पष्‍ट केले. तसेच पत्र श्री.घाडी यांना दिले.
उपोषणकर्ते घाडी भूमिका मांडताना म्‍हणाले की, हरकुळ खुर्द गावात वडिलोपार्जित सामाईक जमीन आहे. त्‍या जमिनीत असलेले घर आपली परवानगी न घेताच निर्लेखित करण्यात आले. त्‍यानंतर या जमिनीतील दोन हिस्सेदारांना बांधकामाची परवानगी देण्यात आली. त्‍यानंतर आपण राहत असलेल्‍या पण मोडकळीस आलेल्‍या, घराच्या बांधणीसाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती; मात्र ग्रामपंचायतीने घरबांधणीची परवानगी नाकारली. सामाईक क्षेत्रातील दोन हिस्सेदारांना घर बांधण्याची परवानगी दिली जाते; मात्र आपणास घर बांधणीसाठी परवानगी दिली जात नसल्‍याने आपण ग्रामपंचायत कार्यालयात उपोषण सुरू केले होते. श्री.घाडी म्‍हणाले, आपल्‍या सामाईक जमिनीमध्ये ग्रामपंचायतीने परवानगी न घेताच रस्ते बांधले आहेत. दुसरीकडे घर बांधणी परवानगी नाकारून आपणास दारिद्र्य रेषेखालील इंदिरा आवास योजनेच्या लाभापासूनही वंचित ठेवले. त्‍यामुळे न्याय मिळण्यासाठी उपोषणाशिवाय पर्याय राहिला नव्हता.
दरम्यान, श्री.घाडी यांनी उपोषण सुरू केल्‍यानंतर ग्रामविकास अधिकारी गणेश परब यांनी त्‍यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीबाबत निर्णय घेण्यासाठी त्‍यांनी ग्रामपंचायतीकडे सादर केलेली कागदपत्रे आणि अन्य कागदपत्रे शोधून याबाबत तीस दिवसांत निणय देण्यात येईल, असे स्पष्‍ट केले. त्यानंतर श्री.घाडी यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी हवालदार मंगेश बावदाणे उपस्थित होते.