रुग्णालयाला घर समजून काम करा ः पांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयाला घर समजून 
काम करा ः पांडे
रुग्णालयाला घर समजून काम करा ः पांडे

रुग्णालयाला घर समजून काम करा ः पांडे

sakal_logo
By

59098
वैभववाडी ः अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना करताना आरोग्य विभागाचे उपसंचालक डी. एस. पांडे.

रुग्णालयाला घर समजून
काम करा ः पांडे

वैभववाडी रुग्णालयात आरोग्य उपसंचालकांच्या कानपिचक्या

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २९ ः मी डॉक्टर, मी नर्स, मी कारकून, मी फार्मासिस्ट, मी सफाई कामगार, मी माझेच काम करणार या मानसिकतेतून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन हे रुग्णालय आपले घर आहे आणि येथे येणारा प्रत्येक रुग्ण आपला कुटुंबातील सदस्य आहे, या भावनेने काम केले पाहिजे, अशा शब्दांत आरोग्य विभागाचे उपसंचालक डी. एस. पांडे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. याशिवाय स्वच्छता, शस्त्रक्रिया विभाग आणि एकूणच व्यवस्थापनावरून धारेवर धरले.
आरोग्य विभागाचे उपसंचालक उपसंचालक पांडे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील उपस्थित होते. उपसंचालक पांडे ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर रुग्णालयातील प्रत्येक विभागाची इत्थंभूत माहिती घेण्यास सुरुवात केली. रुग्णालयीन व्यवस्थापनावर त्यांनी बोट ठेवताच अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. स्वच्छतेवरून त्यांनी सर्वांना चांगलेच धारेवर धरले. ‘‘मी डॉक्टर आहे, मी फक्त रुग्णांना तपासणार, मी फार्मासिस्ट रुग्णांना औषधेच देणार, मी नर्स इजेंक्शन देणार, मी कारकून हिशोबाचे काम करणार या भूमिकेतून सर्वांनी बाहेर या. सफाई कामगाराने सफाई केली पाहिजे; परंतु आपल्या देखील नजरेस धूळ दिसली तर त्याची स्वच्छता आपण केली पाहिजे. त्यात गैर काहीच नाही. ज्या ठिकाणी आपण राहतो ते आपले घर आहे. त्यामुळे रुग्णालयातील प्रत्येकाने आपला ॲटिट्युड बाजूला ठेवून काम केले पाहिजे. वैभववाडी हा ग्रामीण भाग आहे. गरजू, गरीब रुग्ण येथे येतात. त्यांच्यावर चांगले उपचार झाले पाहिजेत. ग्रामीण रुग्णालयाकडून अधिकच्या अपेक्षा लोकांच्या आहेत. बहुतांशी उपचार येथे झाले पाहिजेत. अपरिहार्यता असेल तरच रुग्णांना पुढे पाठवा, अशी सूचना त्यांनी केली.
रुग्णालयीन परिसर तातडीने स्वच्छ करून घ्या, रुग्णांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. बेडशीड दररोज बदला, अशा सूचना केल्या. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांसाठी अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येईल, यासाठी अभिनव उपक्रम राबविण्याची वृत्ती ठेवली पाहिजे, असे स्पष्ट केले. रुग्णालयातील जीर्ण साहित्याचे निर्लेखन करून नव्याने कोणत्या वस्तू हव्या आहेत त्याची मागणी कार्यालयाकडे करा. त्याची पूर्तता करण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
...............
कोट
वैभववाडी हा ग्रामीण भाग आहे. त्यामुळे येथील लोकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हे रुग्णालय तालुक्यातील जनतेला आपलेसे वाटायला हवे, यादृष्टीने पुढील काळात काम केले जाईल. पंधरा दिवसांत शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय लवकरच डॉक्टरांची भरती प्रकिया होणार असून प्राधान्याने वैभववाडीला वैद्यकीय अधीक्षक देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- डी. एस. पांडे, उपसंचालक, आरोग्य विभाग, कोल्हापूर