कणकवलीत १७ पासून संगीत महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत १७ पासून संगीत महोत्सव
कणकवलीत १७ पासून संगीत महोत्सव

कणकवलीत १७ पासून संगीत महोत्सव

sakal_logo
By

59103

कणकवलीत १७ पासून संगीत महोत्सव

शुभा मुदगल यांचे शास्त्रीय गायन; डॉ. अनिश प्रधान यांचे तबला वादन

कणकवली, ता.२९ : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २३ वा संगीत महोत्सव १७, १८ व १९ नोव्हेंबरला होणार आहे. या महोत्सवात यंदाही वर्षी दिग्गज संगीत साधकांना ऐकण्याची संधी संगीत रसिकांना लाभणार आहे. पद्मश्री पंडिता शुभा मुदगल यांचे शास्त्रीय गायन आणि मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. तर डॉ. अनिश प्रधान यांचे एकल तबला वादन सादर होणार आहे.
प्रतिष्ठानच्या वामन दाजी शास्त्रीय गायन महोत्सवाचा प्रारंभ १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाला होणार आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्याधिकारी अवधुत तावडे, पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राचे गुरु पं. डॉ. समीर दुबळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. १८ व १९ नोव्हेंबर रोजी शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा होणार आहे. प्रथम सत्रात सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान ‘गाणाऱ्या आवाजाची तयारी’ याबाबत प. डॉ. समीर दुबळे मार्गदर्शन करतील. तर द्वितीय सत्रात सायंकाळी चार ते सात दरम्यान पंडिता सुभा मुदगल या ‘पुरव अंग ठुमरी गायकी’ याबाबत आणि १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या तृतीय सत्रात ‘ठुमरी मे बोल बनाने के तरीके’ याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
१९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाला शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याचे गायन व पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राची विद्यार्थिनी पल्लवी पिळणकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर डॉ. अनिश प्रधान यांचे एकल तबला वादन होईल. महोत्सवाचा समारोप पद्मश्री पंडिता शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. या महोत्सवात संवादिनी साथ पं. श्री सुधीर नायक करणार आहेत. रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲड. एन. आर. देसाई व कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.