दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा
दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा

दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा
दाभोळ ः दापोली पोलिसांनी गावठी तसेच देशी दारू विनापरवाना ताब्यात ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली असून संशयितांवर गुन्हा दाखल केले आहेत. दापोली पोलिस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र नलावडे हे दापोली-साखळोली मार्गावर जात असताना त्यांना साखळोली-आंबवडे येथे 27 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संशयित कृष्णा भागोजी बैकर (वय 63, रा. आपटी तांबेवाडी) याच्या ताब्यात गावठी हातभट्टीची 620 रुपयांची 12 लिटर दारू मिळाली. संशयित बैकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 27 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वा. हर्णै बंदर येथे संशयित किशोर प्रकाश जाधव (वय 43, रा. हर्णै, मोठी गोडीबाव) याच्याजवळ 12 लिटर गावठी हातभट्टीची दारू व अन्य साहित्य मिळाले असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित जाधव याच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदिवणे येथील सदाशिव गजानन करमरकर (वय 60) यांच्या ताब्यात 3 हजार 360 रुपये किमतीची देशी दारू विनापरवाना आढळून आल्याने त्याच्याविरोधात दापोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
-----------------
भाजलेल्या विवाहितेचा मृत्यू
दाभोळः दापोली तालुक्यातील केळील येथे राहणार्‍या एका विवाहितेचा स्टोव्हचा भडका उडून भाजल्याने उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला. याबाबत दाभोळ सागरी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, केळील येथे राहणार्‍या कुंदा मुंकुद डाकवे (वय 38) या 2 ऑक्टोबरला घरामध्ये रात्री 10.30 वा. स्टोव्हवर जेवण गरम करत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने त्यांच्या साडीने पेट घेतला व त्यात त्या गंभीर भाजल्या. त्यांना तातडीने दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रत्नागिरी येथे पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. रत्नागिरी येथून त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगण्यात आले. कोल्हापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना 16 ऑक्टोबरला सकाळी 4.30 वा. त्यांचा मृत्यू झाला.
-------------
चिपळुणात तीन लाखांचे दागिने लंपास
चिपळूणः कोहिनूर प्लाझा येथील सदनिका फोडून त्यातून 3 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना मे ते ऑक्टोबर महिन्याच्या कालाधीत घडली आहे. या प्रकरणी फिर्यादीची मुलगी व जावयावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावई रहिमतुल्ला युसुफ खोत व मुलगी वहिदा रहिमतुल्ला खोत (दोघे-पेठमाप, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद जुबेदा हमीद तांबे (मालदोली मोहल्ला) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेदा तांबे यांची शहरातील कोहिनूर प्लाझा येथे सदनिका आहे. 23 मे ते 20 ऑक्टोबर या कालावधीत जावई रहिमतुल्ला खोत व मुलगी वहिदा खोत या पती-पत्नीने सदनिका फोडून त्यातील कपाट स्कू ड्रायव्हरने उचकटून लाकडी पेटीचे लॉक उचकटून सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, चैन, कडा, हार असे एकूण 3 लाख 5 हजार 139 रुपयांचे दागिने चोरले. यात रोख रक्कम 25 हजाराचा समोवश आहे.