भातपीक नुकसानीचे पंचनामे करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भातपीक नुकसानीचे पंचनामे करा
भातपीक नुकसानीचे पंचनामे करा

भातपीक नुकसानीचे पंचनामे करा

sakal_logo
By

59141
देवगड ः येथील नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी.

भातपीक नुकसानीचे पंचनामे करा
---
काँग्रेसची मागणी; देवगडमध्ये शिष्टमंडळाचे प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने तालुक्याच्या किनारपट्टी भागात विजांसह जोर केल्याने कापणीला आलेले भातपीक वाया गेले. याबाबत तालुका काँग्रेसने प्रशासनाचे लक्ष वेधले असून, झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून राज्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने तालुका प्रशासनाला दिले.
परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भातपिकाची मोठी हानी झाली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा प्रशासनापर्यंत पोचविण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाने येथील तहसील कार्यालय गाठून निवेदन दिले. या वेळी उल्हास मणचेकर, उमेश कुळकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेश देवगडकर, रशीद खान, सुगंधा साटम, सजाउद्दीन सोलकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की शेतकरी अन्नदाता असल्याने तो जगला तर देश जगेल; परंतु परतीच्या पावसाने शेतीचे व भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना शासनामार्फत पंचनामे होत नाहीत. खरेतर या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज आहे. मात्र, राज्याला शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी काही देणे-घेणे नाही. काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. म्हणून याकडे राज्याचे लक्ष वेधण्यात येत असून, शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत तातडीने द्यावी. तसेच, मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.