भास्कर जाधव यांना मावळचे बाबाराजे देशमुख पुरवणार सुरक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भास्कर जाधव यांना मावळचे बाबाराजे देशमुख पुरवणार सुरक्षा
भास्कर जाधव यांना मावळचे बाबाराजे देशमुख पुरवणार सुरक्षा

भास्कर जाधव यांना मावळचे बाबाराजे देशमुख पुरवणार सुरक्षा

sakal_logo
By

rat29p8.jpg
59059
चिपळूणः मावळ (जि. सातारा) येथील बाबाराजे देशमुख यांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षा पुरवण्याचा शब्द दिला.
-----------
बाबाराजे देशमुख पुरवणार
भास्कर जाधवांना सुरक्षा
चिपळूण, ता. २९ः शिवसेना नेते भास्कर जाधव यांना आता मावळचे शिवभक्त बाबाराजे देशमुख यांचे सुरक्षाकवच मिळणार आहे. बाबाराजे देशमुख यांनी नुकतेच चिपळूणला येऊन भास्कर जाधव यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात फिरत असताना तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली.
एकीकडे शासनाने आमदार जाधव यांचे संरक्षण काढून घेतले आणि दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. कुडाळ आणि मुंबई येथे सरकारच्या विरोधात आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना नेते जाधव यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. याच दरम्यान मध्यरात्री त्यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी सरकारविरोधी बोलल्यामुळे माझी सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला होता. त्यानंतर साताऱ्याचे शिवभक्त बाबाराजे देशमुख यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यामध्ये त्यांनी आमदार जाधव यांची प्रशंसा केली होती. महाराष्ट्र सरकारने जरी आमदार जाधव यांची सुरक्षा काढून घेतली असली तरी राज्यात माझ्या संघटनेचे एक लाख सदस्य आहेत. ते सर्वजण आमदार जाधव यांना सुरक्षा देतील, अशी ग्वाही दिली होती. दिवाळीच्या निमित्ताने आमदार जाधव चिपळूणला होते. या वेळी शिवभक्त बाबाराजे देशमुख यांनी चिपळूणला येऊन त्यांची भेट घेतली. ''तुम्ही बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरा आणि राज्यभर तुमच्या भाषणांचा सुरू असलेला धडाका असाच चालू राहू द्या, संरक्षणाची चिंता करू नका. जिथे जाल तिथे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ'', असा शब्द देशमुख यांनी जाधव यांना दिला आहे.