गणपतीपुळेत हॉटेलची २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळेत हॉटेलची २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक
गणपतीपुळेत हॉटेलची २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक

गणपतीपुळेत हॉटेलची २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक

sakal_logo
By

गणपतीपुळेत हॉटेलची २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक
अज्ञाताविरुद्ध गुन्हाः ई-मेल आयडी, सपर्क नंबर बदलला
रत्नागिरी, ता. २९ ः तालुक्यातील गणपतीपुळे येथील एका हॉटेलचा ई-मेल आयडी बदलून स्वतःचा ई-मेल आयडी देऊन हॉटेलला येणाऱ्या ग्राहकांकडून २९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञाताविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ ते २७ ऑक्टोबर या कालवधीत घडली. गुरुवारी (ता. २७) दुपारी एक च्या सुमारास श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील हॉटेल ग्रिनलिफ द रिसॉर्ट अॅण्ड स्पा येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंकज अनिल नेमाडे (वय २५, रा. सहकारनगर, भुसावळ, जि. जळगाव, सध्या रा. हॉटेल ग्रिनलिफ गणपतीपुळे, रत्नागिरी) हे हॉटेल ग्रिनलिफ येथे नोकरीला आहेत. त्यांनी हॉटेल ग्रिनलिफ द रिसोर्ट अॅण्ड स्पा या हॉटेलच्या नावाने गुगल मॅप या सर्च इंजिनवरील बिझनेस लिस्टमध्ये प्रोफाईल व्यवस्थापनासाठी विनंतीबाबतचा मेसेज पाठवला होता. त्याद्वारे अज्ञाताने हॉटेलचा गुगल मॅप सर्च इंजिनविरील बिझनेस लिस्टींगमध्ये छेडछाड करुन नेमाडे हे अधिकृत ताबाधारक असताना त्यांचा ताबा स्वतःकडे घेऊन हॉटेलचा संपर्क नंबर तसेच हॉटेलच्या ई-मेल आयडी बदलून त्याठिकाणी अज्ञाताने दुसरा ई-मेल आयडी व नंबर अपलोड करुन हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना रुम बुकिंगसाठी पैसे पाठविण्यास भाग पाडून एकूण २९ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारुन ग्राहकांची फसवणूक केली. या प्रकरणी पंकज नेमाडे यांनी जयगड पोलिसात तक्रार दिली.
..........
जुन्या दुचाकीसाठी
४० हजाराची फसवणूक
झरेवाडी येथील घटना, संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ता. २९ः जुनी दुचाकी घेण्यासाठी वेळो-वेळी पैशाची मागणी करुन नंतर दुचाकी न देता फसवणूक करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंसराज हनुमंत कदम (पत्ता माहिती नाही) असा संशयित आहे. ही घटना २७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत हातखंबा झरेवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य वामन कळंबटे (वय २१, रा. झरेवाडी, हातखंबा, रत्नागिरी) यांनी संशयित कदम याने आपल्याकडे सेकंड हॅण्ड दुचाकी विकायची आहे. तसेच गाडीची आवश्यकता असल्यास १ हजार ५५० रुपये डिलीव्हरी चार्ज म्हणून पाठवा असे सांगितले त्या प्रमाणे कळंबटे यांच्या भावाने लिंक असलेल्या त्यांच्या आजोबांच्या अकाऊंटवरुन प्रथम डिलिव्हरी चार्ज पाठवला त्यानंतर वेगवेगळ्या कारणासाठी गुगल पे स्कॅनवरुन एकूण ४० हजार रुपयांची रक्कम संशयिताला पोच केली. मात्र त्यानंतर संशयित कदम यांना दुचाकीबाबत विचारणा केली असता टोलवा टोलवी करण्यात सुरवात केली. फसवणूक केली. या प्रकरणी आदित्य कळंबटे यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करत आहेत.