कोकण रेल्वे तोट्यात जाण्याला वरिष्ठ अधिकारी जबाबदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वे तोट्यात जाण्याला वरिष्ठ अधिकारी जबाबदार
कोकण रेल्वे तोट्यात जाण्याला वरिष्ठ अधिकारी जबाबदार

कोकण रेल्वे तोट्यात जाण्याला वरिष्ठ अधिकारी जबाबदार

sakal_logo
By

कोकण रेल्वेच्या तोट्याला
वरिष्ठ अधिकारी जबाबदार
रत्नागिरी, ता. २९ः गेले अनेक वर्षे कोकण रेल्वेकडे ज्या मागण्या आम्ही करतोय, त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या आमच्या मागणीनुसार चिपळूण रेल्वे स्टेशनला थांबतात, पण काही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत, त्यामुळे कोकण रेल्वेचा तोटा होत असून त्याला वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केला आहे.
चिपळूण येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात अशी प्रवाशांची व आमची मागणी आहे. गेले अनेक वर्षांची चिपळूण दादर पॅसेंजर गाडी-सुरू करावी अशी आमची मागणी आहे. त्याकडे कोकण रेल्वे दुर्लक्ष करीत आहे. कोकण रेल्वे प्रवासी भाडेवाढ, रेल्वेमध्ये प्रवाशांनी दिले जात असलेले जेवणाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. प्रवाशांची संख्या वाढवायची असेल तर प्रवाशांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्याकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. चिपळूणच्या जक्शन रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या सर्व गाड्याना थांबा दिलात, तर कोकण रेल्वे तोट्यामध्ये गेली ती आपण बाहेर काढू शकतो, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनला कळविले आहे.