वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद
वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद

sakal_logo
By

५९१२४
वेंगुर्ले ः नरकासुर स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करताना विवेक कुबल.

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद
वेंगुर्ले ः सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल व कुबलवाडा-माणिकचौक मित्रमंडळ, वेंगुर्ले यांच्यातर्फे रविवारी (ता. १६) येथील श्री देव रामेश्वर मंदिर समोरील वेंगुर्ले शाळा नं. १ च्या पटांगणावर आयोजित नरकासुर स्पर्धेला मोठ्या गटात वांद्रेश्वर मित्रमंडळ वेंगुर्ले, तर लहान गटात धोकमेश्वर सातेरी मित्रमंडळ पाटीलवाडा, वेंगुर्ले यांच्या नरकासुरांनी प्रथम क्रमांक पटकावले. या स्पर्धेत मोठ्या गटात १०, तर लहान गटात १५ स्पर्धक सहभागी झाली. मोठ्या गटात द्वितीय गिरपवाडा मित्रमंडळ वेंगुर्ले, तृतीय यंगस्टार मित्रमंडळ केरवाडा, तर उत्तेजनार्थ क्रमांक झकास मित्रमंडळ वेंगुर्ले यांना गौरविण्यात आले. लहान गटात व्दितीय महाजनवाडी मित्रमंडळ वेंगुर्ले, तृतीय आनंदवाडी मित्रमंडळ वेंगुर्ले व उत्तेजनार्थ गाडीअड्डा मित्रमंडळ यांनी क्रमांक पटकावले. बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.