कर्मचारी पतसंस्था निवडणूक निकाल; न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी पतसंस्था निवडणूक 
निकाल; न्यायालयात धाव
कर्मचारी पतसंस्था निवडणूक निकाल; न्यायालयात धाव

कर्मचारी पतसंस्था निवडणूक निकाल; न्यायालयात धाव

sakal_logo
By

कर्मचारी पतसंस्था निवडणूक
निकाल; न्यायालयात धाव

उमेदवार सावंत यांच्याकडून दावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक निकालादरम्यान कुडाळ सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार अनंत (राजू) रत्नाकर सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाच मते चुकीचा निकष लावून बाद ठरविल्याचा आरोप करणारा दावा सहकार न्यायालय कोल्हापूर येथे दाखल केला आहे.
याबाबत सावंत यांची बाजू अॅड. अनिल निरवडेकर यांनी सहकार न्यायालयासमोर युक्तिवाद करताना मांडली. यानंतर न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली असून ३१ ला पुढील सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सिंधुदुर्ग व उमेदवार अमित गंगावणे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. सावंत यांनी केलेल्या दाव्यानुसार कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी १७ ऑक्टोबरला निवडणूक निर्णय अधिकारी यू. यू. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस मुख्यालय येथे झाली. कुडाळ सर्वसाधारण मतदार संघात एकूण १४८ मतदान झाले होते. मतमोजणीच्यावेळी उमेदवार गंगावणे यांना ७२ मते तर दुसरे उमेदवार सावंत यांना ७१ मते मिळाली व ५ मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या. पैकी ३ मतपत्रिकेवर सावंत व त्यांची निशाणी असलेल्या ''कपबशी'' या चौकोनामध्ये कपबशी या निशाणीवर गोल ठळक शिक्का उमटला आहे; मात्र हा शिक्का उलट्या बाजूने मारल्याचे कारण सांगत मतमोजणी अधिकाऱ्यांनी ह्या मतपत्रिका बाद ठरविल्या. यावर उमेदवार सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवून आपले वकील आल्याशिवाय कुडाळ मतदार संघाचा निर्णय घोषित करू नये, अशी मागणी केली होती; मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही वेळातच गंगावणे यांना विजयी घोषित केले व सावंत यांना न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. सावंत यांनी २० ऑक्टोबरला सहकार न्यायालय, कोल्हापूर येथे या निकालाविरोधात दावा दाखल केला आहे.