फळपीक विमा योजनेबाबत सिंधुदुर्गनगरीत ५ ला सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळपीक विमा योजनेबाबत
सिंधुदुर्गनगरीत ५ ला सभा
फळपीक विमा योजनेबाबत सिंधुदुर्गनगरीत ५ ला सभा

फळपीक विमा योजनेबाबत सिंधुदुर्गनगरीत ५ ला सभा

sakal_logo
By

फळपीक विमा योजनेबाबत
सिंधुदुर्गनगरीत ५ ला सभा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यातील आंबा काजू व केळी या पिकासांठी राबवली जाते. जिल्ह्यातील बागायतदार या योजनेत सहभागी होत असतात. या योजनेच्या अनुषंगाने शासनाने २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ही कंपनी नियुक्त केली आहे. गतवर्षीच्या हंगामातील पीक विम्य़ापोटी अद्याप काही ठिकाणी रक्कम प्राप्त होणे बाकी आहे. तसेच चालू वर्षासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हायचे आहे. हवामान पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत. जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी, कृषी विभाग, विमा कंपनी व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांची एकत्रित सभा ५ नोव्हेंबरला दुपारी तीनला बँकेच्या प्रधान कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत आयोजित केली आहे. या सभेस रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कृषी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेस जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.