संस्था पदाधिकाऱ्यांसाठी कणकवलीत ५ ला चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्था पदाधिकाऱ्यांसाठी
कणकवलीत ५ ला चर्चा
संस्था पदाधिकाऱ्यांसाठी कणकवलीत ५ ला चर्चा

संस्था पदाधिकाऱ्यांसाठी कणकवलीत ५ ला चर्चा

sakal_logo
By

संस्था पदाधिकाऱ्यांसाठी
कणकवलीत ५ ला चर्चा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः कणकवली तालुक्यातील विकास संस्थांच्या सक्षमीकरणाबाबत सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचे चर्चासत्र ५ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता कणकवली येथील श्री भगवती मंगल कार्यालय येथे आयोजित केले आहे. यावेळी ३० जून २०२२ अखेर वसूल पात्र बँक कर्जाची १०० टक्के पूर्ण फेड केलेल्या प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार नीतेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, सुशांत नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रास व सत्कार सोहळ्यास कणकवली तालुक्यातील सर्व विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.