कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत खासदार शेवाळेंशी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत खासदार शेवाळेंशी चर्चा
कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत खासदार शेवाळेंशी चर्चा

कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत खासदार शेवाळेंशी चर्चा

sakal_logo
By

कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत
खासदार शेवाळेंशी चर्चा
चिपळूण, ता. २९ ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या घेऊन कोकण विकास समितीने खासदार राहुल शेवाळे यांची भेट घेतली. प्रवाशांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर बैठक घेऊन रेल्वेसंबंधीचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार शेवाळे यांनी दिले. कोकणातील अनेक चाकरमानी नोकरीधंद्याच्या निमित्ताने मुंबई, ठाणे परिसरात राहतात. ते सणाच्या निमित्ताने गावी येतात. त्यांना भेडसावणारे प्रश्न घेऊन सामाजिक कार्यकर्ते अविनाश राणे यांनी खासदार शेवाळे यांची भेट घेतली. यावेळी दादर-चिपळूण नियमित गाडी सुरू करणे, दिवसा चालणारी व प्रत्येक तालुक्यात थांबणारी दादर-सावंतवाडी गाडी पुन्हा सुरू करणे, पश्चिम रेल्वेवरील तसेच दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत चालवणे, पश्चिम रेल्वेवरील तसेच दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवणे, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस करमाळी एक्स्प्रेस, तिरुनेलवेली दादर एक्स्प्रेस, मंगळुरु मुंबई एक्सप्रेस व कोईम्बतूर हिसार एक्सप्रेस या गाड्यांना खेड येथे थांबा देणे अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी कोकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, उपाध्यक्ष प्रभानंद रावराणे, जलफाउंडेशन कोकण विभाग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव, सुखदेव गायकवाड आदी उपस्थित होते.