‘डीपीडीसी’ सभेच्या तारखेत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डीपीडीसी’ सभेच्या तारखेत बदल
‘डीपीडीसी’ सभेच्या तारखेत बदल

‘डीपीडीसी’ सभेच्या तारखेत बदल

sakal_logo
By

‘डीपीडीसी’ सभेच्या तारखेत बदल
ओरोस, ता. २९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबरला सकाळी अकराला जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यात सरकार बदल झाल्यानंतर पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील पहिली बैठक रद्द झाली; परंतु ही रद्द केलेली बैठक पुन्हा ४ ला सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी याबाबतचे पत्र संबंधित सदस्यांना दिले आहे. यासोबत ३ नोव्हेंबरची नियोजित डोंगरी विभाग विकास समितीची बैठक देखील रद्द केली असून ती ४ ला दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे; मात्र सभा कोणत्या कारणाने रद्द झाली, याचे कारण समजू शकलेले नाही.