‘वॉकेथॉन’द्वारे जनजागृती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वॉकेथॉन’द्वारे जनजागृती!
‘वॉकेथॉन’द्वारे जनजागृती!

‘वॉकेथॉन’द्वारे जनजागृती!

sakal_logo
By

मुंबईत ‘वॉकेथॉन’द्वारे जनजागृती!
मुंबई, ता. २९ : इंडियन ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या १९९०-२०१९ च्या अभ्यासानुसार देशभरात सर्वाधिक मृत्यू मेंदूशी निगडित आजारांमुळे होत आहेत. पक्षाघाताच्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे आवश्यक असल्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक पक्षाघात दिनानिमित्ताने आज सकाळी ग्लोबल रुग्णालयाच्या वतीने मरीन ड्राईव्हला एअर इंडिया ते एनसीपीएपर्यंत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईकरांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वॉकेथॉनमध्ये स्थानिक गट, रुग्णालयाचे कर्मचारी, पक्षाघातामधून बरे झालेले रुग्ण आणि रुग्णालयातील डॉ. पंकज अगरवाल, डॉ. नितीन डांगे, डॉ. शिरीष हस्तक इत्यादी सुमारे १०० जण सहभागी झाले होते. ग्लोबल मोटिवेशनल स्पीकर डॉ. पवन अगरवाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून वॉकेथॉनची सुरुवात करण्यात आली. न्यूरोलॉजी, स्ट्रोक आणि न्यूओक्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. शिरीष हस्तक म्हणाले की, पक्षाघात ही आपत्कालीन स्थिती असून त्यामध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्यामुळे रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे आहे.