‘शिवकन्या’, दुर्गवेडे ग्रुप प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिवकन्या’, दुर्गवेडे ग्रुप प्रथम
‘शिवकन्या’, दुर्गवेडे ग्रुप प्रथम

‘शिवकन्या’, दुर्गवेडे ग्रुप प्रथम

sakal_logo
By

59239
कुडाळ : दुर्गवेडे ग्रुप नाबरवाडीने बनविलेली लोहगडाची प्रतिकृती.
59247
विजयदुर्ग किल्ल्याची लक्षवेधी प्रतिकृती. (छायाचित्रे ः अजय सावंत)

‘शिवकन्या’, दुर्गवेडे ग्रुप प्रथम

कुडाळातील गड-किल्ले स्पर्धा; शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः शिवप्रेमी ग्रुप सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गड किल्ले स्पर्धा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लहान गटात शिवकन्या ग्रुप केळबाईवाडी (मल्हार गड), तर मोठ्या गटात दुर्गवेडे ग्रुप नाबरवाडीने (लोहगड) प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या (ता. ३१) सायंकाळी ४.३० वाजता येथील श्री देवी केळबाई मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दीपोत्सव २०२२ निमित्त ऐतिहासिक गड किल्ले प्रतिकृती बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना इतिहासाची माहिती व्हावी, गड किल्ल्यांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत लहान गटात प्रथम शिवकन्या ग्रुप केळबाईवाडी (मल्हार गड), द्वितीय गणेश परब ग्रुप धैर्यशील प्राइड (प्रतापगड), तृतीय अथर्व राऊळ ग्रुप केळबाईवाडी (सिंहगड) व उत्तेजनार्थ आरोही राऊळ ग्रुप शिक्षक कॉलनी यांना मिळाला. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक दुर्गवेडे ग्रुप नाबरवाडी (लोहगड), द्वितीय आई केळबाई मित्रमंडळ केळबाईवाडी (विजयदुर्ग), तृतीय शिक्षक कॉलनी मुक्तछंद ग्रुप (विजयदुर्ग), उत्तेजनार्थ शिवशक्ती ग्रुप गुढीपूर (रायगड) यांनी मिळविला, अशी माहिती शिवप्रेमी संघटनेमार्फत देण्यात आली. कुडाळ शहरवासीयांनी आपल्या कुटुंबीयांसोबत या किल्ल्यांना भेट देऊन किल्ले बनवणाऱ्या मावळ्यांना प्रोत्साहन द्यावे. गड किल्ले ही आपली संपत्ती आहेत. त्यांची स्वछता आणि निगा कशी ठेवण्यासाठी कटिबद्ध होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शपथ घेऊया, असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेकडून करण्यात आले आहे.