रेकॉर्ड डान्समध्ये मृणाल विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेकॉर्ड डान्समध्ये मृणाल विजेती
रेकॉर्ड डान्समध्ये मृणाल विजेती

रेकॉर्ड डान्समध्ये मृणाल विजेती

sakal_logo
By

59248
दोडामार्ग ः खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेत्या मृणाल सावंतला गौरविताना शिवराम देसाई, बाबा मयेकर, दिलखुश देसाई आदी.

रेकॉर्ड डान्समध्ये मृणाल विजेती

शिरवलबागमध्ये आयोजन; लहान गटात भक्ती सावंत प्रथम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः नवहर्ष युवक कला-क्रीडा मंडळ शिरवलबाग (ता. दोडामार्ग) आयोजित दीपावली शो टाईम २०२२ च्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत (पिंगुळी कुडाळ), तर लहान गटात भक्ती सावंत (वेंगुर्ले) विजेती ठरली. या स्पर्धेचे हे नववे वर्ष होते.
नवहर्ष युवक कला-क्रीडा मंडळ शिरवल बाग आयोजित दीपावली शो टाईम २०२२ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, विलास देसाई, चंद्रशेखर देसाई, शिवराम देसाई, झिलबा देसाई, कुबल गुरुजी, तर बक्षीस वितरणाला बाबुराव धुरी, कुंब्रल सरपंच प्रवीण परब, कोलझर सरपंच उर्मिला देसाई, शिवराम देसाई, दशावतार कलावंत बाबा मयेकर, चंद्रशेखर देसाई, मंडळाचे अध्यक्ष दिलखुश देसाई, तुषार नाईक, वैभव सावंत, रोहन देसाई आदी उपस्थित होते. स्पर्धेत मोठ्या गटातून द्वितीय ऋतिक निकम (रत्नागिरी), तृतीय विभागून-भक्ती जामसांडेकर (सावंतवाडी) व पूजा राणे (रेडी), उत्तेजनार्थ नेहा जाधव (इन्सुली).
लहान गटात द्वितीय पूजा धुरी (रुमडाची गोठण), वैष्णवी मुणनकर (केळुस), तृतीय विभागून- आरव आईर (कुडाळ), नंदिनी बिले (सावंतवाडी), उत्तेजनार्थ सोहम जांभोरे (सावंतवाडी), काव्या गावडे (सावंतवाडी), लीला बोर्डेकर (कुंब्रल बोर्डेकरवाडी) यांनी मिळविला. परीक्षण डॉ. आशिष नाईक (देवगड), समीर गडेकर (गोवा) यांनी केले. दोन्ही गटांत एकूण ४० स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्यांना रोख पारितोषिके, श्री गणेश मूर्ती, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सुजाता देसाई, सिद्धी मलिक यांनी, प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष दिलखुश देसाई यांनी केले. रोहन देसाई यांनी आभार मानले.