शाश्वत रोजगारासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाश्वत रोजगारासाठी ठोस 
कार्यक्रम राबविण्याचा ठराव
शाश्वत रोजगारासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा ठराव

शाश्वत रोजगारासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा ठराव

sakal_logo
By

शाश्वत रोजगारासाठी ठोस
कार्यक्रम राबविण्याचा ठराव

काँग्रेसची बैठक; कुडाळमध्ये विविध विषयांवर चर्चा

कुडाळ, ता. ३० ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार विभाग व माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाची बैठक सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे घेण्यात आली. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची तालुकानिहाय नोंदणी करून त्यांना शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या जिल्ह्यातील युवा वर्ग बुद्धिमान असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी स्पर्धा परीक्षांमध्ये चमकताना दिसत नाहीत. अशा होतकरू युवक-युवतींसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर, रोजगार स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष सुंदरवल्ली पडियाची, माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभाग जिल्हाध्यक्ष डॉ. मयूर शारबिद्रे, रोजगार स्वयंरोजगार विभाग जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद कुंभार आदी उपस्थित होते.