Ratnagiri आरडीसीसीला अग्रगण्य बँक बनवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri
पावस-आरडीसीसी देशातील अग्रगण्य बँक बनली पाहिजे

Ratnagiri : आरडीसीसीला अग्रगण्य बँक बनवा

पावस : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आली आहे. जिल्ह्यातील सर्व ग्राहक व हीतचिंतकांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. पावसमधील सर्व ग्राहकांनी आर्थिक व्यवहार या बँकेमार्फत करावेत. ही बँक देशातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला येण्याकरिता सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बँकेचे संचालक रामभाऊ गराटे यांनी केले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पावस शाखेमार्फत ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला पावस पंचक्रोशीतील सर्व विकास संस्थांचे पदाधिकारी, बचतगटातील महिला, तसेच छोटे मोठे उद्योजक व ग्राहक उपस्थित होते. यावेळी ग्राहकांना बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध कर्जविषयक योजनांची माहिती देण्यात आली.

बँकेचे सहा. सरव्यवस्थापक संदीप तांबेकर यांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा व रत्नागिरी जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांची बँक असल्याने तिच्या प्रगतीसाठी सर्वाचे सहकार्य असणे गरजेचे आहे, असे सांगितले. नाबार्डचे मंगेश कुलकर्णी यांनी नाबार्डमार्फत आर्थिक साक्षरता समावेशीकरण अंतर्गत सुरु असणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. सर्व नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता असणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वेळी ग्राहकांतर्फे अनिल फडके, अमृत फोकडे व लाईक फोंडू यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला मेर्वी ग्रामपंचायत सरपंच शशिकांत म्हादे, पावस पंचक्रोशीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी व बँकेचे शेखर भावे उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्राहक समिती सदस्य चंद्रशेखर नानारकर, रत्नाकर भोसले, दत्तात्रय लाड, यशवंत डोर्लेकर व शाखाधिकारी श्रीमती एस. एस. सिनकर यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :BankingBankKokanRatnagiri