संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आत्मदहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपादित जमिनीचा मोबदला 
न मिळाल्यास आत्मदहन
संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आत्मदहन

संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आत्मदहन

sakal_logo
By

59246
साळिस्ते ः महामार्गावरील सुधाकर नर यांची संपादित केलेली जमिन. (छायाचित्र : एन. पावसकर)

संपादित जमिनीचा मोबदला
न मिळाल्यास आत्मदहन

नर यांचा इशारा; मुख्यमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३० : मुंबई-गोवा महामार्गासाठी साळिस्ते येथील जमीन संपादित करून तशी नोंदही महसूल विभागात केली आहे; मात्र, प्रशासकीय कामातील चुकीमुळे गेली पाच वर्षे मोबदला देण्यास सातत्याने टोलवाटोलवी केली जात आहे. पुढील एक महिन्यात संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यास कणकवली उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जमीन मालक सुधाकर नर यांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि कणकवली उपविभागीय अधिकारी यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २००५ पासून महामार्ग नं. ६६ च्या रुंदीकरणासाठी लागणारी जमीन रितसर नोटीस देऊन कायदेशीररित्या कारवाई करुन संपादित करण्यात आली. संपादित जमिनीची माझ्या सातबारावर नोंद आहे; मात्र जमिनीच्या मोबदल्याची कायदेशीर मागणी केली असता उपविभागीय कार्यालयातून मोबदला न देता खोटी आणि अपुरी माहिती देऊन हे प्रकरण मुद्दामहून आणि द्वेषाने कोर्टात पाठविण्यात आले. उपविभागीय कार्यालयाने केलेल्या घोडचुकीमुळे २०१७ पासून प्रांत कार्यालयाने फसवणूक करून जमीन बळकावून मोठे आर्थिक नुकसान केले आहे. याचा आर्थिक, मानसिक त्रास होत असून त्यामुळे कोर्ट केसेसला हजर राहण्यासाठी शरीर साथ देत नाही. त्यामुळे यापुढे कोर्टात जाणार नाही. पुढील एका महिन्यात संपादित जमिनीचा मोबदला अथवा पूर्ववत माझी जमीन मिळावी; अन्यथा कणकवली उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.