Kokan तांबळडेग वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan
तांबळडेग वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात

Kokan : तांबळडेग वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात

देवगड : तांबळडेग येथील मुक्तद्वार सागर वाचनालयाचा ९४ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी सांघिक स्पर्धा तसेच संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाचनालयाचे अध्यक्ष दिगंबर येरागी यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक खेळात अनुक्रमे, हर्षिदा धुरी, आर्यन प्रभू पहिले दोन आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रभारी मत्स्यव्यवसाय अधिकारी रत्नाकर राजम, सुभान कोळंबकर, रवींद्र कांदळगांवकर, संस्थेचे सचिव रामचंद्र सारंग, सेवानिवृत्त शिक्षक विष्णू निवतकर, उपाध्यक्ष प्रभाकर राजम आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. पहिल्या वर्धापनादिनापासून चालत आलेल्या परंपरेनुसार ‘संगीत जलसा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रभाकर राजम, नितीन कोळंबकर, रश्मी कांदळगावकर, पद्माकर राजम, श्रीकृष्ण राजम, वर्षा राजम आदींनी जुनी-नवीन गीते सादर केली.

यावेळी पांडुरंग कोळंबकर, चंद्रशेखर उपाणेकर, शंकर भाबल, विलास सनये, विशाल कोळंबकर, जीजी कोचरेकर, गंगाराम निवतकर, शुभम धुरी आदी उपस्थित होते. समृध्दी धुरी, माधवी प्रभू, आकांक्षा सारंग, तृप्ती कोळंबकर यांनी रांगोळी रेखाटली होती. रश्मी कांदळगावकर यांनी स्वागतगीत गायिले. विष्णू धावडे यांनी सूत्रसंचालन केले.