तळेरेत ‘आनंदाचा शिधा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेत ‘आनंदाचा शिधा’
तळेरेत ‘आनंदाचा शिधा’

तळेरेत ‘आनंदाचा शिधा’

sakal_logo
By

59294
तळेरे ः आनंदाचा शिधा वाटपाचा प्रारंभ करताना दिलीप तळेकर आदी. (छायाचित्र : एन. पावसकर)

तळेरेत ‘आनंदाचा शिधा’
तळेरे, ता. ३० : येथील रास्त दराचे धान्य दुकानामध्ये दिवाळीनिमित्त शासनाने जाहीर केलेला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. तळेरे, ओझरम आणि दारुम गावातील नागरिकांना शिधा वाटप करण्यात आले. या वाटपाचा प्रारंभ कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते व शशांक तळेकर, शरद वायंगणकर, दारुम सरपंच सुनिंद्र सावंत, ओझरम सरपंच प्रशांत राणे यांच्या उपस्थितीत झाला. अवघ्या १०० रुपयांमध्ये साखर, रवा, चणाडाळ प्रत्येकी १ किलोप्रमाणे व गोडेतेल १ लिटर देण्यात आले. तिन्ही गावातील एकूण ४५० रेशनकार्डधारकांना शिधा वाटप करण्यात आला. यावेळी रवा प्राप्त न झाल्याने तो आल्यानंतर वितरण केले जाईल, असे सांगण्यात आले. शिधा वाटपासाठी संतोष मेस्त्री, बाळकृष्ण तांबे, आप्पा वरवडेकर, आशिष पिसे यांचे सहकार्य मिळाले.