संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

संक्षिप्त

मठमध्ये बुधवारी
दीपावली शो टाईम
वेंगुर्ले, ता. ३० ः संत लालाजी भक्तमंडळ मठ-टाकयेवाडीतर्फे २ व ३ नोव्हेंबरला ''दीपावली शो टाईम''चे आयोजन केले आहे. यामध्ये तालुका व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांत होणार आहेत. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स मोठा गट (१३ वर्षांपुढील)-अनुक्रमे १५००, १०००, ७०० व उत्तेजनार्थ ५०० रुपये व प्रमाणपत्र, लहान गट (पहिली ते सातवी)-१०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ ३०० रुपये व प्रमाणपत्र, तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स- (लहान गट, पहिली ते सातवी)-अनुक्रमे ५००, ३००, २०० व उत्तेजनार्थ १०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धा बुधवारी (ता. २) सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत संत लालाजी मंदिरात होणार आहेत. बक्षीस वितरण ३ ला सायंकाळी ६ वाजता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दशावतार नाटक होणार आहे. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सहभागासाठी मंगळवारपर्यंत (ता. १) नावनोंदणी करावी.

केळूसला ३ पासून
विविध कार्यक्रम
कुडाळ, ता. ३० ः केळूस-बापडतेवाडी येथील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दररोज सकाळी ६ वाजता महापूजा, दुपारी ३ वाजता हरिपाठ, सायंकाळी ४ वाजता आळंदी-पुणे येथील महंतांची प्रवचने, ५ वाजता वारकरी भजने, आरती, पुराण, पालखी होणार आहे. ३ ला रात्री १०.१५ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार संदीप मांडके यांचे ''अहिल्योद्धार'' कीर्तन, ४ ला संदीप मांडके यांचे ''संत तुकाराम'' कीर्तन, ५ ला सदाशिव पाटील यांचे ''संत गोमाई'' कीर्तन, ६ ला चिन्मय देशपांडे यांचे ''विजयी पांडुरंग'' कीर्तन, ७ ला दुपारी १२.१५ वाजता महाप्रसाद, ३ वाजता गायन, सायंकाळी ५ वाजता गोफ, ६ वाजता फुगडी, रात्री १० वाजता दिंडी, २ वाजता मकरंद देसाई यांचे ''राधा गर्व परिहार'' कीर्तन.
.................
दिव्यांग बांधवांना
संघटनेचे आवाहन
मालवण, ता. ३० : येथील पालिकेकडे दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत ५ टक्के निधी राखीव केला आहे. त्यामुळे शहरातील दिव्यांग बांधवांनी १० नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करायचे आहेत. हे हयात दाखले मालवण भरड नाका येथील वायुसुत कम्युनिकेशन सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना शहर अध्यक्ष सत्यम पाटील यांनी दिली आहे.
.............
पोलिसांतर्फे
मिठाई वाटप
ओरोस, ता. ३० ः सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी आनंदाश्रय वृद्धाश्रमातील वृद्धांना दिवाळी सणानिमित्त मिठाईचे वाटप केले. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत देवरे आणि सहकाऱ्यांनी या वृद्धाश्रमाला भेट देत मिठाईचे वाटप केले.
यावेळी त्यांनी वृद्धांशी संवादही साधला. देवरे यांच्यासह उपनिरीक्षक जे. आर. वारा, मणचेकर आदी यावेळी उपस्थित होते. आनंदाश्रयाचे प्रमुख बबन परब यांच्याकडे मिठाई सुपुर्द करण्यात आली. पारंपरिक
.............
''संगोपन'' पुस्तकाचे
कळसुलीत प्रकाशन
कणकवली : कळसुली-दिंडवणेवाडी येथील कवयित्री विशाखा सावंत यांच्या ''संगोपन'' या गीतसंग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. फुगडी, लग्नगीते, ओव्या ही भारतीय संकृती असून तिची जोपासना ''संगोपन''ने केल्याचे उद्गार प्रसिद्ध साहित्यिक, गायक महेश काणेकर यांनी काढले. प्रकाशनप्रसंगी कवी तथा अधिकारी उदय सर्पे, निवृत्त प्राथमिक जयवंत कुलकर्णी, प्रकाश कदम, रेल्वे अधिकारी सुभाष कदम, गुलाब हरड आदी उपस्थित होते. यावेळी कवयित्री विशाखा सावंत, सर्पे यांनी स्वरचित कविताही सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वंभर सावंत यांनी केले.