चिपळूण-स्वच्छतेसाठी श्री सदस्य उतरले रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-स्वच्छतेसाठी श्री सदस्य उतरले रस्त्यावर
चिपळूण-स्वच्छतेसाठी श्री सदस्य उतरले रस्त्यावर

चिपळूण-स्वच्छतेसाठी श्री सदस्य उतरले रस्त्यावर

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat३०p३८.jpg-KOP२२L५९३३४
चिपळूण ः गणेशखिंड ते तांबी मार्गांवर रस्त्यांची स्वच्छता करताना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य.
---------

स्वच्छतेसाठी श्री सदस्य उतरले रस्त्यावर
गणेशखिंड ते तांबी घाट ; दोन टन कचरा संकलन
चिपळूण, ता. ३० ः महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तालुक्यात विविध ठिकाणी श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले. मालघर परिसरातील श्री सदस्यांनी चिपळूण गुहागर महामार्गवर गणेशखिंड ते तांबी घाट दरम्यान स्वच्छता अभियान राबवले. सुमारे ५० सदस्यांनी २ टन ओला व सुका कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली.
श्री सदस्य सकाळी सात वाजता झाडू, घमेली, कुदळ आणि फावडी, खुरपी, रिकामी पोती घेऊन हातात हँडग्लोज तोंडाला मास्क लावून स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले. मालघर, गणेशखिंड परिसरातील श्री सदस्य महिन्यातून एकदा स्वच्छ्ता अभियान राबविणार आहेत. त्यानुसार गणेशखिंड ते तांबी दरम्यान हे स्वच्छ्ता अभियान राबवले जाणार आहे. ३ किमीचा हा रस्ता स्वच्छतेसाठी प्रतिष्ठानने दत्तक घेतला आहे. यावेळी रस्त्यांवर दुतर्फा असणारा कचरा, गवत, बाटल्या, झाडी, प्लॅस्टिक हटविण्यासाठी ५० श्री सदस्यांचे हात सरसावले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्ष लागवड व संवर्धन, निर्माल्य संकलन व खत निर्मिती, बंधारे निर्मिती असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. त्यापैकी रस्ते दत्तक स्वरुपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान घेण्याचे आले आहे. या अभियानात दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते साफ करण्यात येणार आहेत.