राजापूर-रस्ता कामाला अखेर मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-रस्ता कामाला अखेर मुहूर्त
राजापूर-रस्ता कामाला अखेर मुहूर्त

राजापूर-रस्ता कामाला अखेर मुहूर्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat30p39.jpg- KOP22L59335 राजपूर ः डांबरीकरणासाठी आलेले साहित्य.
-----

जकातनाका-जवाहरचौक रस्ता कामाला अखेर मुहूर्त
आजपासून कामाला सुरवात ; एसटीसह अन्य वाहतूक ठेवणार बंद

राजापूर, ता. 30 : गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे रेंगाळलेला आणि खड्डेमय बनल्याने वाहतुकीला धोकादायक बनलेला जकातनाका ते जवाहरचौक रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. रस्त्याच्या कामाला सोमवारपासून (ता.31) सुरवात होणार असून जवाहर चौकाकडून रस्त्याचे बीबीएम करण्याला सुरवात होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरून चालणारी एसटीसह अन्य वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
जकातनाका ते जवाहरचौक रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे पालिका प्रशासनाने एसटी आगारासह पोलिसांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे. रस्त्याच्या बाजूने असलेल्या जलवाहिनीवरील नळकनेक्शनची जोडणी अंतिम टप्प्यात आलेली असून ही नळकनेक्शनची जोडणी आज दिवसभर सुरू होती. जकातनाका ते जवाहरचौक हा शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्याने वाहनांची सतत मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात खड्डे पडतात. त्याप्रमाणे यावर्षी या रस्त्यामध्ये मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे उताराचा आणि वळणांचा असलेला हा रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. गतवर्षीच्या अखेरीला या रस्त्याचा कामाचा शुभारंभही झाला होता. मात्र रस्त्याच्या बाजूने असलेल्या जलवाहिनीवरील नळकनेक्शनची जोडणी आणि त्यानंतर सुरू झालेला पावसाळा आदींमुळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले होते. नवरात्रोत्सवामध्येही धुमाकूळ घालणार्‍या परतीच्या पावसानेही या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पुन्हा एकदा लांबणीवर पडला होता. मात्र आता पाऊस थांबल्याने रस्त्याच्या डांबरीकरण करण्याचे काम सुरू होणार आहे.


चौकट ः
एसटी डेपोतून सोडण्याचा निर्णय

तालिमखाना ते जवाहरचौक रस्त्याचे काम सुरू झाल्याने या मार्गाने होणारी वाहतूक रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत ठप्प ठेवण्याचे आणि या मार्गाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्याचे पालिका प्रशासनाने सूचित केले आहे. मात्र वरचीपेठ परिसरामध्ये राजीव गांधी क्रीडांगणाच्या पुढच्या भागामध्ये रस्ता अरुंद असून काही ठिकाणी नदीच्या बाजूने धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे त्या परिसरातून एसटी वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावोगावी जाणार्‍या एसटी गाड्या सोमवारपासून (ता. 31) एसटी डेपोतून सोडण्यात येणार आहेत. त्याला प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन एसटी आगाराकडून करण्यात आले आहे.