राजापूर-शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच
राजापूर-शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच

राजापूर-शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच

sakal_logo
By

पान 5 साठीमेन

59300
59301

-rat30p28.jpg-
-rat30p29.jpg-
-----------

शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच
पीक चांगले; भात कापणी, झोडपणीची कामे वेगाने
राजापूर, ता. ३० ः नवरात्रोत्सवानंतर धुमाकूळ घालणाऱ्या परतीच्या पावसाने दिवाळीमध्ये विश्रांती घेतली आहे. त्याचा फायदा उचलत शेतकऱ्यांची भातकापणी उरकण्याची लगबग वाढली आहे. भातपकापणी करण्यासह शेतीची उर्वरित कामे करण्यासाठी शेतकरी शेतामध्ये दिसत आहे. एका बाजूला जीवनामध्ये आनंदोत्सव निर्माण करणार्‍या दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी आणि धुमधडाका पाहायला मिळत असताना त्यापासून अलिप्त राहत भातकापणीच्या कामांच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा शेतामध्ये आपली दिवाळी साजरी करताना दिसत आहे.
ऐन लावणीच्या हंगामामध्ये पावसाने दडी मारल्याने भात लावणीची कामांना त्या काळामध्ये काहीसा ब्रेक लागला असला तरी त्यानंतर समाधानकारक पाऊस बरसला. त्यातून भातशेती चांगली झाली. त्यामध्ये विशेषतः हळवी भाताच्या जातींची शेती लवकर कापणीयोग्य झाली. मात्र नवरात्रोत्सवामध्ये पावसाने पुन्हा एकदा धुडगूस घातली. ऐनवेळी आणि सातत्यपूर्ण पडणार्‍या पावसामुळे भातशेतीच्या कापणीच्या कामांना पुन्हा एकदा ब्रेक लागला. दिवसभरामध्ये कधीही कोसळणार्‍या पावसामुळे भातशेतीची कापणी कशी करायची अशा प्रश्‍न शेतकर्‍यांना सतावत होता. अनेक शेतांमध्ये परतीच्या पावसामध्ये भातशेती आडवी होवून जमिनीवर पडलेल्या भाताच्या लोंब्याने नव्याने कोंबही फुटू लागल्याचे दिसत होते. काही शेतांमध्ये वन्यप्राण्यांकडून नुकसान झाल्याचे चित्र दिसत होते. शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंता आणि काळजी निर्माण झाली होती. अशा स्थितीमध्ये अनेक शेतकर्‍यांनी भातकापणी करण्याचे धाडस केले. त्यांना अवकाळी पावसाचा अन् त्यातून होणार्‍या नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्याचा फायदा घेत शेतकर्‍यांनी भातकापणीची कामे उरकण्यावर भर दिला आहे. त्यातून शेतांमध्ये भातकापणीच्या कामांची लगबग दिसत आहे. भातकापणी करताना कापणी करून घरी आणलेले धान्य वाळविण्यासह पावसाळ्यासाठी जनावरांना आवश्यक असलेले गवत सुकवून त्याच्या उडव्या रचून ठेवण्याची काम सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी शेतांमध्ये दिसत आहे. एका बाजूला आनंदोत्सव साजरा केला जात असलेल्या दिवाळीची लगबग आणि धुमधडाका सगळीकडे पाहायला मिळत असताना दुसर्‍या बाजूला भातशेतीच्या कापणीच्या माध्यमातून शेतकरी राजा शेतामध्ये आपली दिवाळी साजरा करताना दिसत आहे.
दरम्यान, सद्यस्थितीमध्ये तालुक्यातील सुमारे सत्तर टक्के भातशेतीच्या कापणीची कामे उरकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतातील कामांचा धुमधडाका पाहता आगामी दहा-पंधरा दिवसांमध्ये उर्वरीत भातशेतीची कापणीची कामे उरकण्याचे चित्र दिसत आहे.