साखरपा-गॅस टँकर उलटून चालक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा-गॅस टँकर उलटून चालक जखमी
साखरपा-गॅस टँकर उलटून चालक जखमी

साखरपा-गॅस टँकर उलटून चालक जखमी

sakal_logo
By

५९३४१

फोटो ओळी
-rat३०p४४.jpg-


गॅस टँकर उलटून चालक जखमी

साखरपा, ता. ३० : दाभोळे घाटात गॅस टँकर उलटून पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. टॅंकर (टीएस-०९-युसी-३६७७) कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास दाभोळे घाटात यू आकाराच्या वळणावर हा टँकर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर डाव्या बाजूस उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झाला ती जागा एकदिशा मार्ग असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली नाही. घटनेचे वृत्त समजताच साखरपा दूरक्षेत्रातील पोलिस आणि महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करून वाहतूक पूर्ववत केली.