साखरपा-गात उकळणीची शतकी परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा-गात उकळणीची शतकी परंपरा
साखरपा-गात उकळणीची शतकी परंपरा

साखरपा-गात उकळणीची शतकी परंपरा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat३०p४६.jpg- KOP२२L५९३५० साखरपा : देवीचे गाणे गाताना शांताराम भागवत सोबत सुधाकर भागवत.
---------

दिवाळीतून देवीचे गाणे गात उकळणीची शतकी परंपरा

शांताराम भागवतांची सेवा ; गाण्यातून नाव घेत घरातील मयत व्यक्तींचे स्मरणत

अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३० : दिवाळीच्या सणातून घरोघरी जाऊन देवीचे गाणे सादर करून नवरात्रातील उकळ पूर्ण करण्याची परंपरा भागवत कुटुंब गेली शतकभराहून जास्त वर्षे जोपासत आहे. शांताराम भागवत हे ७३ व्या वर्षी मुलगा सुधाकर यांच्या बरोबर घरोघरी जात सेवा सादर करत आहेत.
मूळचे देवरूख जवळच्या निवे येथील भागवत हे सरवदे समाजातील कुटुंब. या समाजात गोंधळी परंपरा सुमारे चारशे वर्षांपासून चालत आली आहे. शिवाजी महाराजांनी हेरगिरीसाठी म्हणून या समाजात ही परंपरा रुजवली. सरवदे समाजातील रसाळ कुळ, यादव कुळ, भागवत कुळ अशा कुळांना महाराष्ट्रभर गावे वाटून दिली. नवरात्रातील नऊ दिवस हे गोंधळी देवीचे भुत्ये होऊन गावात घरोघरी देवीची आरती म्हणतात. त्यावेळी ते कोणतीही दक्षिणा घेत नाहीत. दिवाळीनंतर पुन्हा हे गोंधळी पुन्हा घरोघरी फिरून ही दक्षिणा स्वीकारतात. त्याला उकळ परंपरा म्हणतात.
भागवत कुटुंबात बेंडा भागवत यांनी धामणी गोळवली गावात ही परंपरा सुमारे शंभर वर्षांपूर्वी सुरू केली. त्यांचे चिरंजीव बाबू यांनी ती पुढे सुरू ठेवली. त्यांच्या पश्चात शांताराम भागवत हे ७३ व्या वर्षात ही परंपरा त्यांचे पुत्र सुधाकर यांच्या बरोबर पुढे नेत आहेत. सुधाकर हे एसटीत चालक आहेत. पण परंपरा जोपासण्यासाठी ते रजा घेऊन वडिलांबरोबर गावात फिरतात.
सुधाकर यांचा मुलगा सूरज यांच्या रूपात पाचवी पिढी आता परंपरेत सहभागी झाली आहे. सूरज हा सध्या बारावीत शिकतो. कॉलेज नसेल त्या वेळी तो वडील आणि आजोबा यांच्या बरोबर गावात सेवा देतो.
तुणतुणे परंपरेप्रमाणेच ही परंपराही अस्ताला जात चालली आहे. अनेक गावांमधून आता गोंधळी उकळीसाठी फिरणे बंद झाले आहे. पण निवे येथील भागवत कुटुंब मात्र वंशपरंपरेनुसार धामणी आणि गोळवली इथे सेवा देत आहेत.


भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी उकळणी
भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी हे दोघे देवीचा देव्हारा, तुणतुणे आणि टाळ घेऊन गावात येतात. घरोघरी जावून देवी भैरीभवानीचे गाणे गातात. ह्या दरम्यान एक आगळीवेगळी प्रथा भागवत कुटुंबीय पाळतात. ज्या घरात ते जातात. त्या घरातील मयत व्यक्तीचे घरातील लोक सांगतात. देवीचे गाणे झाल्यावर मग शांताराम आणि सुधाकर त्या मयत व्यक्तीचे नाव गाण्यातून सादर करतात. मयत व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी ते असे गाणे म्हणतात.