खेड-तळे येथे धम्मशिबिर उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-तळे येथे धम्मशिबिर उत्साहात
खेड-तळे येथे धम्मशिबिर उत्साहात

खेड-तळे येथे धम्मशिबिर उत्साहात

sakal_logo
By

पान ५ साठी

तळे येथे धम्मशिबिर उत्साहात
खेड, ता. ३० : तालुक्यातील तळे येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ संचलित अरुणोदय ध्यान केंद्राचे बौद्ध धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराचे नेतृत्व धम्मचारी नागरत्न यांनी केले. शिबिराचे पहिले धम्मप्रवचन धम्म यशोदीपा यांनी दिले. शिबिरात ध्यानसाधना, ध्यान सराव माहिती व धम्मप्रवचने, धम्मचर्चा, कम्युनिकेशन स्किल संपर्क सराव, डॉ. आंबेडकरांचा १२ मे १९५०चा लेख, भगवान बुद्ध व धम्माचे भवितव्य या विषयावर चर्चा झाली. शिबिरात धम्मचारी शाक्यमित्र. धम्मचारी अमोघसेन धम्मचारी ज़ीनकीर्ती, धम्मचारिणी यशोदेपा, धम्मचारी यशोश्री धम्म धर्मबल आदी धम्मचारींनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी लोकांचा सखोल धम्माभ्यास घेतला व धम्म प्रेरणा दिली. व्यवस्थापन धम्ममित्र ज्योती कासारे, अर्चना जाधव, राजेंद्र कासारे, धम्ममित्र अशोक सकपाळ, धम्ममित्र अनंत मर्चंडे, देवदास जाधव यांनी केले. चिंकूग या शारीरिक व मानसिक व्यायामाच्या सत्राचे सूत्रसंचालन धम्मचारी शाक्यमित्र यांनी केले.