पेंडुरमध्ये शेतकऱ्यांनी पाहिला ‘मन की बात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेंडुरमध्ये शेतकऱ्यांनी पाहिला ‘मन की बात’
पेंडुरमध्ये शेतकऱ्यांनी पाहिला ‘मन की बात’

पेंडुरमध्ये शेतकऱ्यांनी पाहिला ‘मन की बात’

sakal_logo
By

59348
पेंडूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहताना शेतकरी.

पेंडुरमध्ये शेतकऱ्यांनी पाहिला ‘मन की बात’

भाजपचा पुढाकार; योजनांबाबत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३० ः प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ''मन की बात'' कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात भाजपा पदाधिकारी आपल्या बुथवर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पहातात; मात्र यावेळी हा कार्यक्रम शेतकऱ्यांसोबत पाहण्याचे नियोजन तालुक्यातील पेंडूर गावातील शेतकऱ्यांच्या अंगणात करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच शेती व्यवसाय फायदेशीर बनविण्यासाठी मोदी सरकार सेंद्रिय शेती, शून्य खर्चाधारीत शेती आणि नैसर्गिक शेती या प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना पशुपालन, मस्त्योत्पादन यासारख्या जोडधंद्यातून उत्पन्न मिळावे, यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, उपसरपंच प्रमोद शिरोडकर, बुथप्रमुख हर्षल परब, दीपक परब आदी पदाधिकाऱ्यांसह संभाजी गावडे, कृष्णा नाईक, तानाजी नाईक, रामदास नाईक, तन्मय नाईक, सुरेश नाईक, उत्तम नाईक, भार्गव नाईक, सचिन नाईक, विजय नाईक, सदानंद गावडे, संदीप नाईक, लक्ष्मण गावडे, संतोष नाईक, नारायण नाईक, प्रभाकर गावडे, गुरुनाथ कवठणकर, उत्तम कवठणकर, नरेंद्र गावडे, अंकुश नाईक, दीपक कवठणकर, प्रभाकर नाईक, तुकाराम नाईक, बाळू नाईक, सीमा कवठणकर, वैशाली नाईक, सुमित्रा नाईक, तनुजा नाईक, अंकिता नाईक आदी महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.