अलिबागला छटपुजा उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबागला छटपुजा
उत्साहात साजरी
अलिबागला छटपुजा उत्साहात साजरी

अलिबागला छटपुजा उत्साहात साजरी

sakal_logo
By

अलिबागला छटपुजा
उत्साहात साजरी
अलिबाग, ता.३० : सूर्यदेवाची आराधना करुन सुख शांती आणि संपन्नतेची प्रार्थना करण्यासाठी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय नागरिक अलिबाग समुद्र किनाऱ्यावर उपस्थित होते. छट पुजेसाठी येणाऱ्या भाविकांना प्रशासनानेही सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.
रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात छटपुजा साजरी केली जात आहे. २८ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या छठपूजेच्या तिसऱ्या दिवशी निर्जल उपवास करणारे उत्तर भारतीय नागरिक मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी उपस्थित असल्याचे शिवा यादव यांनी सांगितले. अलिबागमध्ये छटपुजा उत्साहात साजरी करण्यासाठी प्रशासनानेही चांगले सहकार्य केले. छटपुजा मांडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती, त्याचबरोबर पाण्यात उभे राहून सुर्य अर्घ्य देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीही नगरपालिकेने सुरक्षेची विशेष व्यवस्था केली होती.