यंगस्टार मित्रमंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंगस्टार मित्रमंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक
यंगस्टार मित्रमंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक

यंगस्टार मित्रमंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक

sakal_logo
By

59402
कणकवली : होमिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या ऋचा वाळके यांना पैठणी देताना अण्णा कोदे. शेजारी भरत उबाळे, रमेश जोगळे, प्रियाली कोदे, मंदार कोदे आदी. (छायाचित्र ः प्रथमेश जाधव)


यंगस्टार मित्रमंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक

नलावडे ः कणकवलीत ‘होमिनिस्टर’मध्ये वाळकेंना पैठणी

कणकवली,ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंगस्टार कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळाचा नावलौकिक आहे. ४० वर्षांत या मंडळाने विविध सामाजिक, क्रीडा विषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. यापुढील काळात मंडळाने महिलांनाही विविध उपक्रम राबवावेत. या उपक्रमांना नगरपंचायत व समीर नलावडे मित्रमंडळातर्फे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
यंगस्टार मित्रमंडळातर्फे आंबेआळी येथे ‘होममिनिस्टर’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे, उपाध्यक्ष प्रवीण आळवे, सचिव नंदू वाळके, मंडळाचे सल्लागार अनिल हळदिवे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, भरत उबाळे, प्रशांत साटविलकर, संतोष मालंडकर, रवी सावंत, नाना कोदे, राजू वाळके, संतोष पारकर, विवेक वाळके, मंदार कोदे, विद्या वळंजू, नीलम पारकर, प्रियाली कोदे, साक्षी वाळके, रमा वाळके, गार्गी कामत, सान्वी कामत, पूजा माणगावकर, अंकिता सापळे, अमिता राणे, सागर राणे, ऋषी वाळके आदी उपस्थित होते.
अण्णा कोदे म्हणाले, यंगस्टार मित्रमंडळाचे कार्यक्रम व उपक्रम सर्वसमावेश असून यापुढील काळात महिलांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम घेतले जाणार आहेत. तसेच मंडळाचा ‘होममिनिस्टर’ स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. अनिल हळदिवे व रमेश जोगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भरत उबाळे, मंदार कोदे, रमेश जोगळे, सचिन कामत, नाना कोदे, राजू वाळके, प्रियाली कोदे, नंदू वाळके, प्राची कर्पे, साक्षी वाळके, अमिता राणे, गार्गी कामत, सान्वी कामत, रमा वाळके, पूजा माणगावकर, रवी सावंत, संतोष मालंडकर आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेत सहभागी महिलांना मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आली. नितीन घाणेकर यांनी स्पर्धेचे निवेदन केले. बाळू वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.
--
६९ महिलांचा स्पर्धेत सहभाग
दीपावलीनिमित्त यंगस्टार मित्रमंडळाने आंबेआळी येथे ‘होममिनिस्टर’ स्पर्धा आयोजित केली होती. यात ऋचा वाळके या पैठणीच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक भाग्यश्री गावकर तर तृतीय क्रमांक साईशा लाड यांनी प्राप्त केला. या स्पर्धेत ६९ महिला सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.