फुप्फुसाच्या विकारामुळे लागणाऱ्या दम्यावर उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुप्फुसाच्या विकारामुळे लागणाऱ्या दम्यावर उपचार
फुप्फुसाच्या विकारामुळे लागणाऱ्या दम्यावर उपचार

फुप्फुसाच्या विकारामुळे लागणाऱ्या दम्यावर उपचार

sakal_logo
By

rat31p1.jpg -
L59432
डॉ. अनिल सावरकर
----------

वेध वैद्यक विश्वाचा ..... लोगो

इन्ट्रो
---
श्वासोच्छवासाचा होणारा त्रास म्हणजे दमा अशी सर्वसाधारण व्याख्या आपण गेल्या लेखातच पाहिली. या दम्याच्या दोन मुख्य प्रकारांपैकी फुप्फुसाच्या विकारामुळे लागणाऱ्या दम्याची माहितीही गेल्या लेखात ढोबळपणे घेतली होती. दम्याची तपासणी, त्याचे निदान आणि औषधोपचार हे तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच घेणे आवश्यक आहे. न पेक्षा उपायांपेक्षा अपाय अधिक होऊ शकतो, याकडे सजगतेने पाहिले पाहिजे. फुप्फुसाच्या विकारामुळे लागणाऱ्या दम्यावरती औषधोपचारांची दिशा काय असावी आणि ते कोणत्या प्रकारे असावेत, याबाबतची माहिती आज घेऊ.

- डॉ. अनिल सावरकर
-----------------------------------------------

फुप्फुसाच्या विकारामुळे लागणाऱ्या दम्यावर उपचार

फुप्फुसाच्या विकारामुळे लागणारा दमा हा पूर्णत: बरा करता येत नाही; परंतु दमा असलेले बहुतांश लोक त्याला नियंत्रणात ठेवू शकतात जेणेकरून त्यांना थोडी आणि कमी सातत्याने लक्षणं उद्भवतात आणि ते क्रियाशील जीवन जगू शकतात. जर अ‍ॅलर्जी उत्पन्न करणारा घटक ओळखून त्याच्या संपर्कात न येता आपण राहू शकलो तर दमा लागत नाही. उदा. काही लोकांना रत्नागिरीच्या दमट हवेत दम लागतो; पण हेच लोक घाटावर कोरड्या हवेत राहावयास गेले तर दम लागत नाही. अ‍ॅलर्जी असलेला घटक ओळखून त्याची इंजेक्शन बनवली जातात व त्यातील थोडे थोडे इंजेक्शन रोज टोचून हळूहळू त्या माणसाचे त्या अ‍ॅलर्जीपासून रक्षण केले जाते म्हणजे त्या माणसाच्या शरीरात त्या अ‍ॅलर्जीविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार केली जाते व तो रुग्ण त्यापासून लागणार्‍या दम्यापासून मुक्त होतो, हे तज्ञांकडून करून घ्यावे.
पण, काही अ‍ॅटॅक हे इतरांपेक्षा भयानक असतात. एका तीव्र दमा अ‍ॅटॅकमध्ये हवेचा मार्ग इतका बंद होतो की पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन महत्वाच्या अवयवांपर्यंत पोचू शकत नाही. अशी स्थिती वैद्यकीयदृष्ट्या आपत्कालीन असते. तीव्र स्वरूपाच्या दमा अ‍ॅटॅकमध्ये लोकांचा जीव जाऊ शकतो. अशा प्रकारात रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. त्यामुळे आपणास दमा असल्यास आपण आपल्या डॉक्टरांना वारंवार भेटले पाहिजे. कोणत्या गोष्टी आपल्यात दम्याची लक्षणे निर्माण करतात आणि त्यांना कसे टाळावयाचे हे शिकून घेण्याची आपल्याला गरज आहे. आपला दमा आटोक्यात ठेवण्यासाठी आपले डॉक्टर औषधे लिहून देतील. याशिवाय
* योग्य प्रकारची जीवनशैली स्वीकारणे, म्हणजे या पदार्थांची पेशंटला अ‍ॅलर्जी असेल त्यापासून दूर राहाणे, जेवणात ते पदार्थ वर्ज्य करणे, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे यात श्‍वासोच्छवासाचे व्यायाम-प्राणायाम इत्यादी. सदा आनंदी राहाणे, व्यसनापासून लांब राहणे इत्यादी.
*योग्य आहार घेणे, आहारात भरपूर व्हिटॅमिन घेणे जेणेकरून प्रतिकारशक्ती वाढेल.
* भरपूर पाणी पिणे
* घर स्वच्छ ठेवणे
* पाळीव प्राण्यांपासून दूर राहणे
* थंडीत नाकातोंडावर मास्क वापरणे. आवश्यक असेल तर रात्री खोलीत हिटर लावणे.
* तुमच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळचे वेळी घेणे.
* औषधे ः यात गोळ्या, इन्हेलर, नेबुलायझर वगैरे प्रकार आहेत ते तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे.
* दम्यावर बर्‍याच प्रकारची तोंडाने घेण्याची औषधे, गोळ्या आहेत. त्याही उपयोगी आहेत; पण दम्याची सर्व औषधे तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत कारण, कोठले औषध केव्हा व कोणाला लागू पडेल व कोणत्या रुग्णाला किती प्रमाणात औषध द्यायचे हे फक्त तज्ञच ठरवू शकतात. याशिवाय शरीरात इतर कोणता आजार तर काही औषध वर्ज्य असतात व काही औषधांचे प्रमाण बदलावे लागते.
* विशेष प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत वापरावयाची औषधे म्हणजे ही औषधे फारच उपयोगी व आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवणारी आहेत; परंतु या औषधांचे दुष्परिणामसुद्धा खूप आहेत. अयोग्य प्रकारे घेतल्यास शरीराचे न भरून येणारे नुकसान होते. म्हणून ही औषधे फक्त तज्ञांनीच गरज असेल तेव्हा वापरायची आहेत. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांनी स्वत:च्या मर्जीनुसार ही औषधे घेऊ नयेत.
-----------