रायपाटण बागवाडी पुलाच्या जोडरस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायपाटण बागवाडी पुलाच्या जोडरस्त्याची दुरवस्था
रायपाटण बागवाडी पुलाच्या जोडरस्त्याची दुरवस्था

रायपाटण बागवाडी पुलाच्या जोडरस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

rat31p17.jpg
59445
राजापूरः दयनीय अवस्था झालेला रायपाटण पुलाच्या येथील जोडरस्ता.
--------
रायपाटण-बागवाडी पुलाच्या
जोडरस्त्याची दुरवस्था
राजापूर, ता. ३१ः तालुक्यातील रायपाटण येथील बागवाडीला जोडणाऱ्या वाहतुकीचा पूल बांधून दोन वर्षे झाली असून या पुलाला दुतर्फा जोडणार्‍या जोडरस्त्यासह संपूर्ण मार्गावरील खडी उकटून वर आली आहे. त्यामुळे रायपाटण बागवाडीकडे जाणाऱ्या वाहनांसह ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या संपूर्ण रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण पूर्ण व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही प्रदीर्घ काळ अर्जुना नदीच्या पलीकडे वसलेल्या तालुक्यातील रायपाटण येथील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडी व बौद्धवाडी अशा चार वाड्यांकडे जाण्यासाठी वाहतुकीचा पूल नव्हता. पुलाच्या मागणीसाठी या चार वाडीतील ग्रामस्थांनी काही वर्षांपूर्वी उपोषण केले होते. त्याची दखल राजकीय वर्तुळातून घेतली गेली होती. माजी खासदार नीलेश राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी माजी खासदार राणे यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची रायपाटण येथील चार वाडीतील ग्रामस्थ प्रतिनिधींसमवेत भेट घेऊन या पुलाचा प्रश्‍न मार्गी लावला. सुमारे दोन वर्षामध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण झाले; मात्र, या पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्यापही रखडलेले आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणार्‍या वाहनांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. तर, रायपाटण होळीचा मांडापासून नदीपलीकडे बौद्धवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील सर्व खडी उकटून वर आलेली आहे. त्यातून वाहने चालवणे खूपच अवघड बनले आहे. पादचारी प्रवाशांनाही या रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या रखडलेल्या या जोडरस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी प्रवाशांसह ग्रामस्थांकडून केली जात आहे.