संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat31p19.jpg ः-KOP22L59456 देवरूख ः लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आमदार शेखर निकम.
--------
आमदार निकम यांच्या देवरूखवासीयांना शुभेच्छा
देवरूख ः चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना प्रत्यक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 1990 ला आमदार झाल्यानंतर रवींद्र माने यांनी ही प्रथा सुरू केली होती त्यांनी आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत ती जोपासली. त्यानंतर आमदार झालेले सुभाष बने, सदानंद चव्हाण यांनीही ही प्रथा जोपासली. याचप्रमाणे आमदार शेखर निकम यांनीही आज ही प्रथा जोपासली. विशेष म्हणजे आजच्या या शुभेच्छा फेरीत राष्ट्रवादीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
फोटो ओळी
-rat31p20.jpg-KOP22L59457 ः खेड ः येथील स्वच्छतामोहिमेत सहभागी झालेले श्री सदस्य.
------------
श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम
खेड ः देशात दिवाळी सण उत्साहात सुरू आहे. घराची आणि परिसराची साफसफाई केल्यानंतर महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या श्री सदस्यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी पहाटे खेडमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. खेड-भरणे आणि खेड-चाकाळे या दोन राज्यमार्गांवर स्वच्छता आणि साफसफाई उपक्रम राबवण्यासाठी शेकडो श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. हा उपक्रम महिन्याच्या चौथ्या रविवारी नेहमी राबवला जाणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने या वेळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, भरणे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप खेराडे, ग्रामविकास अधिकारी आंग्रे यांनी सहभाग घेतला. भडगाव ग्रामपंचायतचे महेंद्र सावंत व अन्य सदस्य पदाधिकारीदेखील स्वतः या मोहिमेत सहभागी झाले होते.