कुडाळमध्ये भाजपतर्फे खेळाडूंना आर्थिक मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये भाजपतर्फे खेळाडूंना आर्थिक मदत
कुडाळमध्ये भाजपतर्फे खेळाडूंना आर्थिक मदत

कुडाळमध्ये भाजपतर्फे खेळाडूंना आर्थिक मदत

sakal_logo
By

swt313.jpg
59461
कुडाळः राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेले सौरभ स्पोर्ट्सचे खेळाडू. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळमध्ये भाजपतर्फे
खेळाडूंना आर्थिक मदत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळः येथील सौरभ स्पोर्ट्स खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबाबत त्यांचे कुडाळ भाजपच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व विशाल सेवा फाउंडेशनतर्फे तसेच कुडाळ भाजप यांच्यावतीने खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली. त्यांच्या सर्व प्रवासाची जबाबदारी भाजपच्यावतीने घेण्यात आली. येथील सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी सर्व खेळाडूंना मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी खो-खो खेळाडूंसह भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नीलेश तेंडुलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा अध्यक्ष पप्या तवटे, उपाध्यक्ष चंदन कांबळी, सोशल मीडिया युवा संयोजक राजवीर पाटील, नगरसेवक अॅड. राजीव कुडाळकर, विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर, श्रावण शिरसाट, अनुप जाधव, राम बांदेलकर, विलास वराडकर, प्रसन्न गंगावणे आदी उपस्थित होते.
................
swt314.jpg
59462
भरत मेस्त्री

भरत मेस्त्रींना पुरस्कार जाहीर
कुडाळः आर्ट बिटस् फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘कला सन्मान २०२२’ पुरस्कार वाडीवरवडे-मेस्त्रीवाडी येथील रहिवाशी आणि हेळेकर दशावतारी नाट्य मंडळ कारिवडेचे कलावंत भरत मेस्त्री यांना जाहीर झाला आहे. मेस्त्री यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची लोककला या कला विभागातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना संस्थेमार्फत देण्यात आले. नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन पद्धतीने पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला आशा सर्व विभागांतील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे, असे संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले.
.............