रत्नागिरी- चतुरंगच्या मैफलीस उदंड प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- चतुरंगच्या मैफलीस उदंड प्रतिसाद
रत्नागिरी- चतुरंगच्या मैफलीस उदंड प्रतिसाद

रत्नागिरी- चतुरंगच्या मैफलीस उदंड प्रतिसाद

sakal_logo
By

rat३१p१२.jpg
५९४३५
वहाळ (ता. चिपळूण) ः चतुरंगची दिवाळी मैफल रंगवताना कलाकार श्वेता तांबे-जोगळेकर, अजिंक्य पोंक्षे आणि वादक कलाकार हेरंब जोगळेकर, चैतन्य पटवर्धन, श्रीरंग जोगळेकर, सारंग जोशी.
----------
सूर प्रभाती रंगती’ने दिवाळी मैफल रंगली
वहाळला मैफल ; अभंग, भक्तिगीते, भावगीतांचे सादरीकरण
रत्नागिरी, ता. ३१ ः कोकणातील चोखंदळ रसिकांसाठी नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या चतुरंगची दिवाळी पहाट ''सूर प्रभाती रंगती'' मैफल वहाळ गावात (ता. चिपळूण) रविवारी (ता. ३०) उत्साहात साजरी झाली. विशेष म्हणजे चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गात सहभागी झालेले निवडक हुशार विद्यार्थी, पालक आणि वहाळ पंचक्रोशीसह चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी परिसरातील रसिकांनी तुडुंब प्रतिसाद दिला. अगदी घरच्यासारख्या दिवाळीचा; पण सामुदायिकपणे एकत्र येऊन पुरेपूर आस्वाद घेतला.
दिवाळी पहाट मैफल ही संकल्पना चतुरंगने ३६ वर्षांपूर्वी मांडली व सुरू केली. त्यानंतर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अशा मैफली होऊ लागल्या. चतुरंगची ही ५१ वी दिवाळी पहाट होती. गायिका श्वेता तांबे-जोगळेकर आणि गायक अजिंक्य पोंक्षे या नावलौकिक कमावलेल्या कलाकारांनी मैफल रंगवली. अगदी सुरवातीपासूनच रंगलेल्या या मैफलीत लोकप्रिय अभंग, भक्तिगीते, भावगीते, नाट्यगीते सादर केली.
हे प्रभाती रंगलेले सूर मनभर साठवत, फराळाचा आस्वाद घेत, मनमोकळ्या गप्पागोष्टी करत, गाठीभेटी घेत दिवाळी पहाट साजरी झाली. मैफलीसाठी तबलासाथ हेरंब जोगळेकर, संवादिनीसाथ चैतन्य पटवर्धन, ऑर्गनसाथ श्रीरंग जोगळेकर, सारंग जोशी याने तालवाद्याची साथ केली. उत्कर्षा प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पाध्ये यांनी कलावंतांचे अत्तरकुपीने स्वागत केले. प्रदीप इनामदार यांनी आभार मानले.
-------------
चौकट
संवादासह नाट्यपदे
गायकांनी ''संगीत संशयकल्लोळ'' मधील पाच-सात पदे नाटकातीलच संवादासह ''मेलडी'' पद्धतीने सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळाली. कार्यक्रमाचे निवेदक निबंध कानिटकर यांनी संगीत नाटक आणि मैफल यातील सादरीकरणाच्या कलाकारांच्या वेगवेगळ्या अनुभवविषयी दोन्ही कलाकारांना बोलते करत त्यांच्या मनातील भाव जाणून घेण्याचा सुंदर प्रयत्न केला.