हजार बंधाऱ्यांचे कणकवलीत उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हजार बंधाऱ्यांचे 
कणकवलीत उद्दिष्ट
हजार बंधाऱ्यांचे कणकवलीत उद्दिष्ट

हजार बंधाऱ्यांचे कणकवलीत उद्दिष्ट

sakal_logo
By

कणकवलीसाठी
एक हजार बंधारे
कणकवली ः तालुक्यात उन्हाळी हंगामात उद्भवणारी पाणी टंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजनेची तयारी सुरू केली आहे. यावर्षी कणकवलीसाठी एक हजार कच्चे व वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी ही मोहीम राबविली जाते. बंधारे बांधल्यामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. यंदाही बंधारे बांधण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. कणकवली तालुक्यासाठी एक हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे.
--
झोळंबेत भजन
स्पर्धेचे उद्‍घाटन
दोडामार्ग ः झोळंबेतील भजनप्रेमी व ग्रामस्थांतर्फे माऊली मंदिरात आयोजित भजन स्पर्धेचे उद्‍घाटन बांद्यातील उद्योजक भाऊ वळंजू यांच्या हस्ते झाले. यावेळी शशी पित्रे, माजी सभापती अशोक दळवी, पंचायत समिती माजी सदस्य राघोजी सावंत, नारायण राणे, विश्वास घाग, गजानन नाटेकर, पंचायत समिती माजी सदस्य गणेशप्रसाद गवस, सरपंच राजेश गवस, उपसरपंच पांडुरंग गवस, माजी सरपंच सतीश कामत, दादा परब, दाजी परब, परीक्षक विठ्ठल गवस, एन. डी. गवस आदी उपस्थित होते. जगदीश गवस यांनी प्रास्ताविक, संदीप गवस यांनी सूत्रसंचालन तर संतोष वझे यांनी आभार मानले.
--
पेंढरीत ४ पासून
विविध कार्यक्रम
देवगड ः पेंढरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी उत्सव आयोजित केला आहे. शुक्रवारी (ता.४) सकाळी अभिषेक, पूजा, होम, काकड आरती, त्यानंतर वारकरी भजने, सायंकाळी दिंड्या, ढोलपथकांचे ढोलवादन, शनिवारी (ता.५) दिवसभर वारकरी भजने, सायंकाळी स्थानिक भजने, रात्री दहाला व्यंकटेश बुवा नर (उंडील फणसगाव) व बुवा रविकांत घाडी (कुणकेश्वर) यांचा डबलबारी भजनी सामना होणार आहे. रविवारी (ता.६) सायंकाळी तुळशी विवाह तसेच धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
...............
वेंगुर्ले शहरात
किल्ले लक्षवेधी
वेंगुर्ले ः दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी बनविलेले किल्ले लक्षवेधी ठरत आहेत. राऊळवाडा येथील शिवतेज बाल मित्रमंडळाने बनविलेला किल्ला आकर्षक आहे. परिसरातील नागरिक हा किल्ला पाहण्यासाठी हजेरी लावत असून मुलांचे कौतुक करीत आहेत. हा किल्ला बनविण्यासाठी अर्जुन देवासी, नचिकेत माडये, नंदिता परब, रणवीरसिंह रावळ, श्रवणकुमार देवासी, नंदीत परब या शालेय मुलांनी परिश्रम घेतले. शिवतेज बाल मित्रमंडळाने किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.