धान्य वितरणास मुदतवाढ देण्याची मनसेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धान्य वितरणास मुदतवाढ देण्याची मनसेची मागणी
धान्य वितरणास मुदतवाढ देण्याची मनसेची मागणी

धान्य वितरणास मुदतवाढ देण्याची मनसेची मागणी

sakal_logo
By

swt319.jpg
L59469
गुरुदास गंवडे

धान्य वितरणास मुदतवाढ
देण्याची मनसेची मागणी
सावंतवाडी, ता. ३१ः रास्त धान्य दुकानावर सर्व्हर डाऊन होत असल्याने तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिक आनंदाचा शिधा तसेच धान्यापासून वंचित राहिले आहेत. अशा नागरिकांना लाभ मिळण्यासाठी धान्य वितरणास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गवंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून शंभर रुपयांतून मिळणारा आनंदाचा शिधा धान्य दुकानांवर वेळेत पोहोचला नाही. त्यामुळे त्याचे वितरण करण्यास विलंब झाला आहे. दुसरीकडे दुकानावर धान्य वितरण करताना सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे बऱ्याच दुकानांवर धान्य वितरण करण्याचे बाकी राहिले असून अनेक नागरिक धान्यापासून वंचित आहेत. त्यांना धान्याचा लाभ मिळावा, यासाठी धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे.