‘महिला व बालकल्याण’तर्फे योजनांचे २३१ प्रस्ताव मंजुर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महिला व बालकल्याण’तर्फे 
योजनांचे २३१ प्रस्ताव मंजुर
‘महिला व बालकल्याण’तर्फे योजनांचे २३१ प्रस्ताव मंजुर

‘महिला व बालकल्याण’तर्फे योजनांचे २३१ प्रस्ताव मंजुर

sakal_logo
By

‘महिला व बालकल्याण’तर्फे
योजनांचे २३१ प्रस्ताव मंजुर

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ ः जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ६३८ प्रस्ताव प्राप्त असून त्यापैकी २३१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महिला बाल कल्याण विभागाकडून देण्यात आली.
जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागामार्फत २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ७६ लाख ३१ हजार ३६० रुपये निधीची तरतूद आहे. त्यामध्ये वस्तू खरेदीच्या योजनांसाठी ३६ लाख ५३ हजार ८० रुपये, तर महिलांना प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनांसाठी ३६ लाख ५३ हजार ८० रुपये, इतर योजनांसाठी ३ लाख २५ हजार २०० रुपये तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभाग वस्तू खरेदीच्या विविध योजनांसाठी ४१५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत १४६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तसेच महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनांसाठी २२३ प्रस्ताव प्राप्त असून त्यापैकी ८५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
महिला लाभार्थींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध वस्तू खरेदीच्या योजनांमध्ये मागासवर्गीय महिला लाभार्थींना घरघंटी पुरविणे-प्राप्त २४ प्रस्तावांपैकी ६ प्रस्ताव मंजूर, सर्वसामान्य महिलांना घरघंटी पुरविणे-१४५ पैकी ४८ मंजूर, शिलाई मशिन पुरविणे-६६ प्रस्ताव पैकी १९ मंजूर, मुलींना सायकल पुरविणे-१४१ प्रस्तावांपैकी ६५ मंजूर, छोटे किराणा दुकान-५ पैकी २ मंजूर, पल्वरायजर-१ पैकी १ मंजूर, मिनी राईस मिल-१ पैकी १ मंजूर, मसाला उद्योग-१ पैकी ०, पिको फॉल मशिन-१ पैकी १, कुक्कुट पालन-३ पैकी १, शेळी पालन-४ पैकी १, चाप कटर-१ पैकी १, शीतपेटी-२२ पैकी ० प्रस्ताव असे १४६ प्रस्ताव मंजूर झाले. तर प्रशिक्षण व सक्षमीकरण योजनेमध्ये केक बनविणे-३ पैकी ३, फॅशन डिझाईन-३ पैकी ३, शिवणकाम-१६ पैकी १४, ब्युटी पार्लर ११ पैकी ०, एम एस सी आय टी १७७ पैकी ६३ परिचारिका प्रशिक्षण २ पैकी २, टॅली १ पैकी ०, टायपिंग-१० पैकी ० अशाप्रकारे एकूण २२३ प्रस्तावांपैकी ८५ प्रस्ताव मंजूर आहेत.
...........
चौकट
योजनांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्ह्यातील महिला लाभार्थींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत; मात्र निधीच्या तरतुदीनुसार पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे योजनांसाठीचा निधी यावर्षी लवकरच खर्च होईल, अशी माहिती महिला बाल कल्याण विभागाने दिली.