गुणवंतांचा आचरा येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुणवंतांचा आचरा येथे सत्कार
गुणवंतांचा आचरा येथे सत्कार

गुणवंतांचा आचरा येथे सत्कार

sakal_logo
By

swt3116.jpg
59491
आचराः यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना नीलिमा सावंत व इतर मान्यवर.

गुणवंतांचा आचरा येथे सत्कार
आचरा : आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वीतेसाठी झोकून देऊन काम करणे गरजेचे आहे. तुमच्या यशातूनच शाळेचा नावलौकिक वाढणार आहे. यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी सभापती आणि आचरा हायस्कूल स्कूल समिती अध्यक्षा नीलिमा सावंत यांनी येथे केले. मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात समई नृत्य सादर करून तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या आचरा कॉलेजच्या विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचा सत्कार समारंभ न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल समितीतर्फे आचरा हायस्कूल येथे पार पडला. स्कूल समितीचे अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, बाबाजी भिसळे, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, कॉलेजचे प्राचार्य दळवी, भावना मुणगेकर, रावले, शिक्षक उपस्थित होते.
.................

swt3117.jpg
59492
मालवणः जिज्ञासा फाउंडेशनतर्फे तारकर्ली, देवबाग किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मालवण, ता. ३१: जिज्ञासा फाउंडेशनच्यावतीने देवबाग, तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये संस्थेचे सदस्य तसेच स्थानिक हॉटेल व्यावसायिक व महिला सहभागी झाल्या होत्या. देवबाग, तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यांवर या संस्थेने तारकर्ली एमआयडीसी ते देवबाग संगम अशा पाच किलोमीटरच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यासाठी साधन सामग्री रजत दळवी व विंडमील हॉटेलचे मालक यांनी हँडग्लोव्हज, कचरा गोळा करण्यासाठी पिशव्यांची मदत केली. सूरज भोसले, बाबली चोपडेकर, वैभव खोबरेकर यांनी अल्पोपहाराची सोय केली. या मोहिमेमध्ये स्थानिक व्यावसायिक तसेच यूट्यूबर लकी कांबळी, अंकिता प्रभुवालावलकर, मंदार शेट्ये हे देखील सहभागी झाले होते.
................